Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात एक प्रकारे संघर्षाची स्थिती, शरद पवार यांनी व्यक्त केली खंत; महायोद्धा पुरस्काराने सन्मानित

शिवाजी विद्यापीठात व्हाईट आर्मी संघटनेच्या वतीने शरद पवार यांना महायोद्धा हा पुरस्कार देऊन खासदार शाहू महाराज हस्ते सन्मानित करण्यात आले. जिल्हा आपत्ती निवारण केंद्राच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 23, 2025 | 09:48 PM
राज्यात एक प्रकारे संघर्षाची स्थिती, शरद पवार यांनी व्यक्त केली खंत; महायोद्धा पुरस्काराने सन्मानित

राज्यात एक प्रकारे संघर्षाची स्थिती, शरद पवार यांनी व्यक्त केली खंत; महायोद्धा पुरस्काराने सन्मानित

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर/वार्ताहर

राज्यात येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमुळे एक प्रकारे संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून अशाआपत्ती व्यवस्थापन काळात मदतीसाठी पुढे धावणाऱ्या संस्थांना बळ देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्यावर आली आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठात व्हाईट आर्मी संघटनेच्या वतीने शरद पवार यांना महायोद्धा हा पुरस्कार देऊन खासदार शाहू महाराज हस्ते सन्मानित करण्यात आले .यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्हाईट आर्मी आणि शिवाजी विद्यापीठ, जिल्हा आपत्ती निवारण केंद्राच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सत्काराला उत्तर देताना खासदार शरद पवार यांनी आपल्या मनोगतात आपत्ती व्यवस्थापनाचे अनेक पैलू उलगडले. लातूर जिल्ह्यातील तिल्लारी भूकंपात हजारो घरं पडली अनेक लोक मृत्युमुखी पडले. अशावेळी इतर जिल्ह्यांची मदत घेऊन तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव भूकंपग्रस्त ठिकाणी भेट देणार होते. मात्र पंतप्रधान आल्यास शासकीय यंत्रणा यांच्या दीमतीला द्यावी लागेल, त्यातून मदत कार्यात विस्कळीतपणा येईल ही बाब नरसिंहराव यांना पटवून दिले.

भूकंपग्रस्त ठिकाणी सध्या तरी येऊ नये असं त्यांना स्पष्ट सांगितला त्यानंतर १९९२ ला मुंबईतील दंगल वाढत चालल्याने केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची सूचना पंतप्रधान नरसिंहराव यांनी केली. त्यानुसार केंद्रातून परत येऊन अवघ्या तीन-चार दिवसात मुंबईतील कायदा सुव्यवस्था आपण रुळावर आणली. मुंबईत दहा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले ही सर्व ठिकाणा ही हिंदू समाजाशी संबंधित होते. अशा कृत्यातून जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न असल्याचा माझ्या निदर्शनासला आल्यानंतर महंमद अली रोडवर बॉम्बस्फोट झाल्याचा आपण स्वतः आकाशवाणीवरून जाहीर केले. अशा पद्धतीने हिंदू समाजाला सुद्धा शांत करून जलद गतीने दुसऱ्या दिवशी मुंबईतील जनजीवन सुरळीत केले. गुजरात मधील भूज येथे झालेल्या भूकंप नंतरची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्यावर सोपवली.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचा अध्यक्ष पद आपल्याला दिले. इतर देशातील आपत्ती संबंधातील मदत कार्य आणि कायद्याचा अभ्यास करून भारतासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार केला ; हाच कायदा देशातील प्रत्येक संकटात जनतेच्या मदतीसाठी उपयुक्त ठरतोय त्याचच आपल्याला समाधान असल्याचे खासदार शरद पवार यांनी नमूद केले.

शासकीय यंत्र आणि स्वयंसेवी संस्था आपत्तीच्या वेळी झोकून देऊन काम करतात. अशा संस्थांना नागरिक म्हणून पाठींबा देण्याची जबाबदारी सर्वांची आहे .
देशात आणि महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी भूकंप ,बॉम्बस्फोट ,जातीय दंगली घडल्या अशा आपत्ती त्या त्यावेळी अनेकदा आपण तेथे धावून गेलो आहे. यंत्रणा कामाला लावली आहे, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन शक्य झाले राज्यातील सर्वच आपत्ती काळात प्रशासकीय यंत्रणेने चांगले काम केले आहे. अनेक संस्था या अशा वेळी कामासाठी पुढाकार घेतात. अशा संघटनाना, संस्थांना बळ देण्याची जबाबदारी आपली आहे.

खासदार शाहू महाराज म्हणाले, खासदार शरद पवार यांनी भूकंप, बॉम्बस्फोट आशा अनेक आपत्तीमध्ये केलेले काम अतिशय चांगले आहे. देशात आणि महाराष्ट्रात अनेक प्रकारचे संकटे आली. अशावेळी योग्य निर्णय घेत त्यांनी त्यावेळी मदत पोहचवत सहकार्य केले. अतिशय योग्य व्यक्तीला हा पुरस्कार दिला आहे.

व्हाईट आर्मीचे संस्थापक, अध्यक्ष अशोक रोकडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आपत्ती व्यवस्थापनात काम केलेल्या अनेक संघटना आणि संस्थांच्या प्रतिनिधींचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, कुलगुरू डॉक्टर डी. टी .शिर्के प्रकुलगुरू प्रमोद पाटील, कुलसचिव शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के . पवार ,शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे ,सरोज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. तर अमोल कोडीलकर यांनी आभार मानले.

Web Title: Mp shahu maharaj honored sharad pawar with mahayoddha award on behalf of white army association at shivaji university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2025 | 09:48 PM

Topics:  

  • Shivaji University

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.