MPDA action on notorious accused Gopal Thorat, lodged in Central Jail
अमरावती : विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला गोपाल मधुकर थोरात (३३, रा. चवरे नगर, अमरावती) याच्यावर एमपीडीएची (MPDA) कारवाई करण्यात आली असून, त्याला अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात (Amravati District Central Jail) स्थानबध्द केले आहे.
पोलीस आयुक्त (Commissioner of Police) डॉ. आरती सिंह (Dr. Aarti Singh), पोलीस उपायुक्त विक्रम साळी (Deputy Commissioner of Police Vikram Sali), सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात राजापेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Rajapeth Senior Police Inspector) मनीष ठाकरे (Manish Thackeray) यांनी आरोपी गोपाल थोरातविरुध्द एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाची कायदेशीर पुर्तता आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव बचाटे व पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शेंडे यांनी पूर्ण करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तो प्रस्ताव सादर केला.
या प्रस्तावाची मंजूरी मिळाल्यानंतर गोपाल थोरातविरुध्द एमपीडीएचे आदेश पारीत करण्यात आले. पोलीस हवालदार राजेश गुरेले, डीबी चे पोलीस अंमलदार सागर सरदार, निलेश गुल्हाणे, दिनेश भिसे, विकास गुडधे, नरेश मोहरिल यांनी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमीत होताच आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यांत घेतले, २६ जुलै रोजी गोपाल थोरातला अमरावती मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले.