सतीश वाघोले यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पेपरफुटी आणि कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावरून राज्यात मोठी चर्चा सुरू आहे. पुण्यात विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तब्बल दहा दिवस आंदोलन केलं होतं. राज्य सरकारने चौकशी समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आणि विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. आता भीमनवार यांच्या अनुपस्थितीत आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर संबंधित प्रकरणात काही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. यानंतर परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आणि विद्यार्थ्यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
या प्रकरणावरून पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. सरकारच्या वतीने मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केली. चौकशी समिती स्थापन करण्याचं आश्वासन आणि भीमनवार यांच्या रजेच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं.
Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
भीमनवार रजेवर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत आयोगाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी सतीश बबन वाघोले यांच्याकडे देण्यात आली आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या वतीने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
सतीश वाघोले यांनी सप्टेंबर 2026 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून पदभार स्वीकारला होता. 7 सप्टेंबर रोजी विवेक भीमनवार यांनीच त्यांना सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ दिली होती. आता अवघ्या महिनाभरात बदललेल्या परिस्थितीत त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार राज्य सरकारने चौकशी आयोगाची अधिसूचना काढली आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग काम करणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासह तुकाराम मुंढे, गणेश पाटील आणि लखामी गौतम यांचा आयोगात समावेश असल्याचं दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आलं आहे.
आता या चौकशीतून पेपरफुटी प्रकरण आणि आयोगातील कथित गैरप्रकारांबाबत काय निष्पन्न होतं, याकडे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचं लक्ष लागलं आहे.
सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन
Ans: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.
Ans: हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेशी संबंधित आहे.
Ans: निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. आयोगाच्या सदस्यांमध्ये निवृत्त न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासह इतर सदस्यांचा समावेश आहे.






