''... त्यामुळे आज तुमच्या मनातील सावरकर द्वेष सर्वांसमोर आला आहे''; हिंदुत्वावरून भाजपचे ठाकरेंवर टीकास्त्र
काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे राजकरण केवळ याच आहे. महाविकास आघाडीने या मुद्द्यावरून राज्य सरकारला चांगलेच घेरले आहे. त्यातच नारायण राणे आणि आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये राजकोट किल्ल्यावर राडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी जनतेची माफी मागितली. तसेच वाढवण बंदराच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील छत्रपती शिवराय आणि शिवभक्तांची माफी मागितली. मात्र यावरून उद्धव ठाकरे यांनी महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही अशी टीका मोदींवर केली. आता या टीकेला भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
”आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले ही फार मोठी शोकांतिका आहे.. स्वातंत्रवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार..? झालेल्या घटनेबद्दल माफी मागतानाच, सोबत वीर सावरकरांचे नाव घेणे ही जर उद्धव ठाकरेंना मग्रुरी वाटत असेल, तर ते अतिशय दुर्दैवी आहे. ज्या वीर सावरकरांनी शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली, त्यांचे नाव घेणे तुम्हाला मग्रुरी वाटते..? तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज पुढे आला आणि आपण हिंदुत्व सोडले यावर पुन्हा एकदा आज शिक्कामोर्तब झाले..! लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही..जय जिजाऊ जय शिवराय !”
”तुम्ही कोणाकोणाची माफी मागणार आहात?भ्रष्टाचाराने पुतळा कोसळला त्याची माफी मागणार? राममंदिर गळतंय त्याची मागणार की घाई गडबडीने बांधलेले संसदेला गळती लागली त्याची माफी मागणार? नक्की कशाकशाची आणि कोणाकोणाची तुम्ही मागणार? छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान आहे. शिवद्रोह्याना महाराष्ट्र कधीही माफ करत नाही”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे.
आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली, त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले ही फार मोठी शोकांतिका आहे..
स्वातंत्रवीर सावरकर यांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यावर अजून काय होणार..?
झालेल्या घटनेबद्दल… pic.twitter.com/JHFy8Q9qRq
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 1, 2024
ज्या वीर सावरकरांनी शिवरायांवर सुंदर अशी आरती लिहिली, त्यांचे नाव घेणे तुम्हाला मग्रुरी वाटते..? तुमच्या मनातील सावरकर द्वेष आज सर्वांसमोर आला आहे. त्यामुळे आपण हिंदुत्त्व सोडले यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. लक्षात ठेवा ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही. चित्रा वाघ यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे.