
मुंबई : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधरावी म्हणून केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरू केली. पण काही शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता या योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे.
योजनेमध्ये अशा प्रकारे करण्यात आले बदल-
पीएम किसान योजनेसाठी आता काही कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. जे शेतकरी ही कागदपत्रे जमा करतील त्यांनाच या योजनेचा ११वा हप्ता मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी रेशनकार्ड, आधारकार्ड, बँकपासबुक, आणि घोषणापत्र सादर करणे गरजेचे आहे. ही सर्व कागदपत्र सादर केल्यानंतरच शेतकरी या योजनेचा लाभ घेता येईल. आणि जे शेतकरी (Farmer) अपात्र ठरतील त्यांना सर्व अटी आणि शर्तीनुसार आत्तापर्यंत जेवढे हप्ते मिळाले आहेत. त्या हप्त्याची रक्कम परत द्यावी लागणार आहे.
अशा प्रकारे तपसा योजनेत तुमचे नाव-
१) वेबसाइटवर लॉग इन करा.
२) उजव्या बाजूला तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल त्यावर क्लिक करा.
३) आता पर्यायामधून Beneficiary Statusवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक (Bank) खाते आणि तुमचा मोबाईल नंबर यासारखी काही माहिती द्यावी लागेल.