फोटो सौजन्य- सोशल मीडिया
दिंडीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी अभंग, गजर आणि हरिनामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून टाकला. ‘श्री गुरू मोरे माऊलींच्या जयघोषासह विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांनी भक्तीमय वातावरण निर्माण केले.
सदगुरु दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शन व उपस्थितीमुळे या दिंडी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. माऊलींचे दर्शन घेण्यासाठी तसेच आशीर्वाद मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकरी आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला. दादर परिसरात निर्माण झालेल्या या भक्तिमय वातावरणामुळे उपस्थित भाविक भारावून गेले.






