आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ झाली आहे. पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे येथे पार पडले आहे. लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला.
काटेवाडी मध्ये आगमन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. काटेवाडीतील विसाव्यानंतर पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर काटेवाडी बस स्थानकाजवळ पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात रंगले.
आषाढी वारीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने पुढील प्रवासाला सुरुवात केली आहे. लोणंदमधील दीड दिवसांच्या मुक्कामानंतर पालखी मार्गस्थ झाली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावातून दिंडी क्रमांक २८२ मध्ये सहभागी होत वरवंड गावापर्यंत ते सहकाऱ्यांसह पायी चालले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवादही साधला.
शहराच्या मध्यवर्ती भागातून सकाळी लवकर या पालख्या निघणार असल्यामुळे काही रस्ते हे बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबत पुणे वाहतूक पोलिसांनी माहिती दिली असून पर्यायी मार्ग देखील सांगितले आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्यवस्तीसह इतर भागात तात्पुरता वाहतूकीत बदल केले असून, गुरुवारी (दि १९) रात्री दहा ते सोमवारी (दि २३) रात्री अकरा वाजेपर्यंत हा बदल असणार आहे.
Devendra Fadnavis Dehu live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देहूमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून मराठी भाषेबाबत मत व्यक्त केले.
आषाढी एकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
स्वागत मंडपामुळे वारकऱ्यांना चालवण्यात अडथळा निर्माण होत असल्याची पालखी सोहळा प्रमुखांची तक्रार गांभीर्याने घेत मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आषाढी वारीची सर्वत्र चर्चा असते. पुणे जिल्ह्यामधील पालखी मार्गाचे आणि पालखी विसावा स्थळाची पाहणी करण्यात आली आहे. यामुळे एक चैतन्यमयी वातावरण आहे.
देहूनगरीमधून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले आहे. यावेळी संपूर्ण शहर हरिनामाच्या गजरात दंगून गेले असून लाखो वारकरी वारीमध्ये सामील झाले आहेत.
संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामुळे पालखी मार्गावरील वाहनांची कोंडी होऊ नये. यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.