मुंबई : अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही चांगलाच वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. ओबीसी आरक्षणावरून चांगलेच रणकंद होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची वीज तोडणी, ओबीसी आरक्षण, नवाब मलिकांचा राजीनामा इत्यादीव विषयांवर विरोधक आक्रमकपणे सरकारला जाब विचारणार आहेत. तर तेवढ्याच ताकदीने महाविकास आघाडीनेही विरोधकांना उत्तरे देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच वादळी ठरण्याची शक्यता आहे
दरम्यना नवाब मलिक राजीनामा द्या, ठाकरे सरकार हाय हाय, वसुली सरकार हाय हाय अशा घोषणा भाजप आमदारांकडून देण्यात आल्या. तर, नवाब मलिकांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजप आमदारांची स्वाक्षरी मोहीम राबवली. त्यावर पहिली सही देवेंद्र फडणवीस यांनी केली. पायऱ्या जवळ बॅनर वर सह्या करण्यात येत आहेत. विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही जाता जाता सही केली.
[read_also content=”भीषण बॉम्बस्फोटात ७ जणांचा मृत्यू, ४ घरे जमीनदोस्त, काही जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती, आयबीने काही दिवसांपूर्वी दिला होता अलर्ट https://www.navarashtra.com/india/7-killed-in-bomb-blast-4-houses-demolished-some-buried-in-heaps-nrps-248869.html”]