Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आनंदाची बातमी ! आता जमीन नावावर नसली तरी शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी; सन्मान निधीचा मार्ग मोकळा

राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अल निनोच्या प्रभावामुळे बहुतांश भागांत पावसाने दडी मारली. परिणामी खरीप आणि रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी अन्न, पाणी आणि चाऱ्याच्या संकटाचा सामना करत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2026 | 07:22 AM
आनंदाची बातमी ! आता जमीन नावावर नसली तरी शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी; सन्मान निधीचा मार्ग मोकळा

आनंदाची बातमी ! आता जमीन नावावर नसली तरी शेतकऱ्यांना मिळणार फार्मर आयडी; सन्मान निधीचा मार्ग मोकळा

Follow Us
Follow Us:
  • जमीन स्वतःच्या नावावर नसलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही आता फार्मर आयडी मिळणार 
  • महाराष्ट्र सरकारने फार्मर आयडीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला.
  • भाडेतत्त्वावर जमीन घेऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई : जमिनीच्या महसूल अभिलेखांमध्ये नाव नसल्यामुळे फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. आता भाडेतत्त्वावर जमीन घेऊन शेती करणारे, कराराने शेती करणारे तसेच १ जानेवारी २०१५ पूर्वीपासून जमिनीवर प्रत्यक्ष शेती करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला असून, महसूल विभागाने शासनादेश जारी करून नवी कार्यपद्धती निश्चित केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. फार्मर आयडी मिळाल्यामुळे आतापर्यंत तांत्रिक आणि महसुली अडचणींमुळे सरकारी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेता येणार आहे.

चार श्रेणींतील शेतकऱ्यांना पात्रता

१. १ जानेवारी २०१५ पूर्वीपासून संबंधित जमिनीवर प्रत्यक्ष शेती करणारे आणि आजही जमिनीचा ताबा असलेले शेतकरी. यासाठी किमान एक वैध दस्तऐवज आवश्यक.
२. अधिकृतरीत्या भाडेतत्त्वावर जमीन घेऊन शेती करणारे शेतकरी.
३. विधिवत कराराच्या आधारे शेती करणारे शेतकरी.
४. शासनाकडून जमीन वाटप झालेली किंवा कायदेशीर जमीन वितरण प्रक्रियेतून जमीन मिळालेले पात्र शेतकरी.

याशिवाय शासनादेशात नमूद केलेल्या अन्य समान आणि न्याय्य अपवादात्मक प्रकरणांमध्येही फार्मर आयडी देता येणार आहे.

तीन स्तरांवर कागदपत्रांची होणार पडताळणी

फार्मर आयडी देण्यापूर्वी तीन स्तरांवर कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

पहिला टप्पा : तलाठी गावातील जुने व अद्ययावत महसुली अभिलेख, जमीन महसूल भरल्याच्या पावत्या, इनाम नोंदवही, सनद, भाडेपट्टा, करारपत्र आणि जमीन वाटप आदेशांची तपासणी करतील. संबंधित कागदपत्रांच्या प्रती अॅग्रीस्टॅक प्रणालीवर अपलोड करणे बंधनकारक असेल. पात्र शेतकऱ्यांची यादी ग्रामचावडीवरही प्रसिद्ध केली जाईल.

दुसरा टप्पा : मंडळ अधिकारी तलाठ्यांनी केलेली प्राथमिक पडताळणी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची फेरतपासणी करतील.

तिसरा टप्पा : तहसीलदार तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची अंतिम तपासणी करतील. मंजुरीनंतर संबंधित शेतकऱ्याच्या कृषी जमीन क्षेत्रासाठी कायमस्वरूपी फार्मर आयडी दिला जाईल.

पाणंद रस्त्यांसाठी ११६ कोटींचा निधी जारी

राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अल निनोच्या प्रभावामुळे बहुतांश भागांत पावसाने दडी मारली. परिणामी खरीप आणि रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, शेतकरी अन्न, पाणी आणि चाऱ्याच्या संकटाचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यांत पाच हजार रुपयांची अग्रिम आर्थिक मदत जमा केली होती. आता दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाधित शेतकऱ्यांसोबत सण साजरा करण्यासह नव्या मदतीची घोषणा केली आहे.

FAQ

1. जमीन स्वतःच्या नावावर नसतानाही फार्मर आयडी मिळणार का?

होय. पात्र भाडेकरू, कराराने शेती करणारे आणि ठरावीक अटी पूर्ण करणाऱ्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे.

2. कोणत्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार?

भाडेतत्त्वावर जमीन घेऊन शेती करणारे, कराराने शेती करणारे तसेच १ जानेवारी २०१५ पूर्वीपासून प्रत्यक्ष शेती करणारे पात्र शेतकरी.

3. हा निर्णय कोणत्या सरकारने घेतला?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Farmers will receive a farmer id even if they do not have land registered in their name nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 07:22 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.