Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mukhyamantri Ladki Bahin Yojna: निकषात बसत नसाल तर…; लाडक्या बहिणींना आदिती तटकरेंचा थेट इशारा

आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या अर्जांची तपासणी सुरू होणार असल्याची चर्चा होती. पण फक्त तक्रारी आल्यास अर्जांची तपासणी केली जाईल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 15, 2025 | 09:24 AM
Mukhyamantri Ladki Bahin Yojna: निकषात बसत नसाल तर…; लाडक्या बहिणींना आदिती तटकरेंचा थेट इशारा
Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करणाऱ्या महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या चांगलीच चर्चेत आहे. निवडणुकीपूर्वी सरसकट महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जात होते. पण आता या योजनेला काही निकष लावण्यात आले आहेत. या निकषांमुळे अनेक अपात्र महिलांची नावे वगळली जाणार आहेत. यासंदर्भात महिला व बालकल्याण विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

1. स्वतःहून नावे वगळण्याचा सल्ला : महिला व बालकल्याण विभागाने निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून योजनेतून नावे कमी करावी, असे आवाहन केले आहे. अपात्र महिलांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांना योजनेतील अनुदानाची रक्कम परत करावी लागेल.

शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची आमदारकी धोक्यात? ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता

2. पैसे परत भरण्याचा नियम : अपात्र महिलांनी योजनेतून नावे काढली नाहीत तर त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या लेखाशिर्षावर पैसे भरावेत, अशी सूचना सचिव अनुपकुमार यांनी केली आहे.

3. लाभ वितरण : योजनेतील लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरीत करण्यात आला असून, जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट लाभार्थी महिलांकडून पाहिली जात आहे. मात्र, अपात्र महिलांना योजनेतून नाव वगळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

4.  अर्ज मागे घेतलेल्या महिला : याआधी, धुळे आणि पुणे जिल्ह्यातील दोन महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत, ज्यामुळे त्यांचे अनुकरण इतर महिलांनी करावे, असा संदेश दिला जात आहे.

संभाजीनगर दोन निर्घृण हत्येनं हादरलं; ऑनर किलिंगचा प्रकार की

महिला व बालकल्याण विभागाच्या या कृतीमुळे योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारचा कटाक्ष दिसून येतो. ही योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी असून, अपात्र महिलांनी योजनेचा गैरवापर टाळावा, हा यामागील उद्देश आहे.

आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींच्या अर्जांची तपासणी सुरू होणार असल्याची चर्चा होती. पण फक्त तक्रारी आल्यास अर्जांची तपासणी केली जाईल. त्यामुळे जर आपण या योजनेच्या निकषात बसत नसाल आणि तरीही लाभ घेत असाल, तर त्वरित सावध व्हा आणि आताच अर्ज मागे घ्या, असे आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळ यांनीही यावर भाष्य करत सांगितले आहे की, अपात्र महिलांना नावे मागे घ्यावी लागतील किंवा दंड भरण्याची तयारी ठेवावी लागेल. त्यामुळे अपात्र लाभार्थींना दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. जर आपण या योजनेचे निकष पूर्ण करत नसाल, तर योजनेचा लाभ घेणे थांबवा. अन्यथा, आपल्या विरोधात कारवाई होऊ शकते. योजना निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांनीच योजनेचा लाभ घ्यावा, अशी विनंती केली जात आहे. अपात्र लाभार्थ्यांनी योग्य ती पावले उचलून आपले नाव मागे घ्यावे, जेणेकरून अनावश्यक कारवाई किंवा दंडाची वेळ येणार नाही.

Web Title: If you do not meet the criteria of ladki bhahin yojana withdraw your application aditi tatkares direct warning nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 09:07 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.