File Photo : Crime
छत्रपती संभाजीनर : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण आता वाढताना दिसत आहे. क्षुल्लक कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे घडतना दिसत आहेत. असे असताना संभाजीनगर दोन निर्घृण हत्येनं हादरलं आहे. राष्ट्रीय गुन्हा नोंदणी ब्यूरोकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, भारतात 2019 आणि 2020 मध्ये 25 ऑनर किलिंगच्या हत्या नोंदवलेल्या होत्या आणि 2021 मध्ये 33 पण हे आकडे नोंदलेल्या प्रकरणांवर आधारित आहेत, वास्तविक संख्या याहून जास्त असेल, असा अंदाज आहे.
ऑनर किलिंगचे प्रकार सामाजिक आणि कुटुंब, जात आणि धर्म यांची ‘प्रतिष्ठा’ जपण्याच्या दृष्टीकोनातून फोफावते. मात्र, प्रस्थापित कायद्यांना बगल देऊन निष्पाप मारले जातात. कुटुंबाच्या गौरव आणि आदराचे संरक्षण करण्यासाठी जेव्हा ते जाती, धर्माच्या दृष्टीने विवाह किंवा संबंधांना सामोरे जातात. अशा प्रकरणांमध्ये पीडित ही महिलाच असते, तर काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये पुरुषांचाही समावेश असतो. असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या दोन वर्षांत समोर आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे असे आहेत आदेश
ऑनर किलिंगसंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस अधीक्षक किंवा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्याचे आदेश डिसेंबर 2023 रोजी दिले होते. या कक्षात समाजकल्याण आधिकारी यांचा सदस्य म्हणून तर महिला बालकल्याण आधिकारी यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश आहे.
शहरातील ऑनर किलिंगच्या घटना
अमित साळुंके यांनी 2 मे 2024 रोजी इंदिरानगरातील विद्या गीताराम कीर्तिशाही हिच्यासोबत पुण्यात आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. या लग्नाला विद्याच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे नवदाम्पत्य महिनाभर पुण्यात राहिले. मात्र, विद्याचे वडील गीताराम आणि चुलत भाऊ अप्पासाहेब कीर्तिशाही यांच्या धमक्या सुरूच होत्या. त्यामुळे पुण्यासारख्या ठिकाणी मुलांना गाठून मारल्यास त्यांना मदतही मिळणार नाही. त्यामुळे अमितच्या कुटुंबाने त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलावून घेतले. मात्र, गीताराम आणि अप्पासाहेब यांनी 14 जुलै 2024 रात्री अमितला गाठून चाकूने भोसकून त्याचा खून केला.
काव्या (नाव बदलेले) ही 17 वर्ष 2 महिन्यांची होती. तिचे गावात एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. ही अंबड तालुक्यातील एका गावात आपल्या आई वडिलासह राहत होती. ती बारावीत शिक्षण घेत होती. काव्याचे गावातील एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, त्यातून ती त्या मुलासोबत पळून गेली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिची समजूत काढून तिला पुन्हा घरी आणले. त्यानंतर तिचे समुपदेशन करण्यासाठी वळदगाव येथील तिच्या काकाकडे पाठविले
दरम्यान, तिच्या प्रेम प्रकरणाबद्दल तिच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने ऋषिकेश तिला समाजवून सांगत होता. मात्र, ती ऐकण्यास तयार नव्हती. 6 जानेवारी 2025 रोजी तो तिला तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरवर घेऊन गेला व तेथून तिला खाली ढकलून खून केला.