फोटो सौजन्य सोशल मिडिया
मिरा रोड शिवार गार्डन zepto येथे काम करणाऱ्या मुलींना जय पाठक स्टोर मॅनेजर याच्याकडून छेडछाड करणे हात लावणे मानसिक त्रास देण्याचं काम करत होता. मनसे कार्यकर्त्याकडून त्याला चांगला चोप देण्यात आला असून मिरा रोड कनकिया पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विषयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज एका मुलीची छेड काढली आहे; उद्या दुसऱ्यामुलींची छेड काढेल. अशी मनसे कार्यकर्त्यांनी zepto मध्ये काम करणाऱ्या मुलींना ताकीद दिली.
आम्ही सर्व मुली स्टोर मध्ये पॅकिंगची कामे करतो. जय पाठक आम्हाला शारिरीक रित्या अश्लिल वर्तन कारायचा; आम्ही या आदी सुद्धा त्यांना बजावून सांगितले होते. आज आम्ही आमच्या घरी तक्रार केली. आमच्या सोबत मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले आणि जय पाठक याला चोप देऊन पोलिसात पकडून दिले आहे. असे Zepto स्टोअरमधे काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी म्हटले.
zepto मध्ये काम करणाऱ्या मुलींनी तक्रार दिल्या नंतर मनसे कार्यकर्त्यांनी zepto मॅनेजर जय पाठक याला चोप देत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले. पोलिसात zepto मॅनेजर जय पाठक याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस आता पुढील तपास करत आहेत.






