मुंबई महनगरपालिका जिंकण्यासाठी महाविकास आघाडी आपली पूर्ण ताकद पणाला लावताना दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये कोण एकत्रित लढणार आहेत आणि कोण स्वतंत्रपणे याबाबत अजून अंदाज आलेला नाही.
आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होताना दिसण्याची शक्यता आहे. पण राज ठाकरे यांना सोबत घेणं हे काँग्रेसच्या मुंबईतील काही नेत्यांना मान्य नाही.
अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. शिवरायांना जलाभिषेक करून मनसे कार्यकर्ते पुढे सरसावल्याचे दिसून आले
काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांचा मनसेला सोबत घेण्यास विरोध असल्याचे दावेही करण्यात आले. मात्र, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत सर्व संभ्रम दूर केला
पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्यानंतर राज्यभर विरोधक आक्रमक झाले असून, आज मीरा-भाईंदर शहरात काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाईंदर येथ जोरदार आंदोलन
अंबरनाथ नगरपालिकेच्या अंतिम मतदार यादीत मोठा गोंधळ. एकाच वॉर्डात शहराच्या विविध भागांतील आणि उल्हासनगरच्या माजी नगरसेवकांची नावे. महाविकास आघाडी आणि मनसेचे गंभीर आरोप, यादी शुद्ध करूनच निवडणूक घेण्याची मागणी.
दररोज कुठून ना कुठून नवे पुरावे समोर येत आहेत. मी ‘ॲनाकोंडा’ म्हणतोय ते विनोदाने नाही. यांची भूक शमतच नाही — पक्ष चोरला, निशाणी चोरली, नाव चोरलं, आता माझे वडिलसुद्धा चोरायचा…
या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पवार आणि डाव्या पक्षांचे नेते, अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. हा मोर्चा दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रीटपासून सुरू होईल
गुहागर मनसेचे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर चिपळूण तालुक्यातील उमरोली गटात सक्रीय आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी करणार असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले.
Khed News: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधीच कोकणात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांना मोठा धक्का बसला आहे.
मनसेच्या इशाऱ्यानंतर काल शनिवारी पालिका प्रशासनाने तगड्या पोलीस बंदोबस्तात स्टेशनजवळील पूर्वेकडील भागात प्रखर कारवाई केली. या कारवाईत अतिक्रमण केलेले फुटपाथ आणि अनधिकृत शेड्स जमीनदोस्त करण्यात आल्या.
Raj Thackeray: मनसे नेते राज ठाकरे यांचा पदाधिकारी मेळावा पार पडला आहे. यामध्ये त्यांनी निवडणूक आयोगावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अजित पवारांची मिमिक्री केल्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी आपले मौन सोडले आहे. अजित पवार यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
Raj Thackeray Press : मनसे नेते राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरु आहे या फक्त माध्यमांतील चर्चा आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.