‘लालबाग'चा राजा (फोटो- सोशल मिडिया)
या १० दिवसांच्या उत्सवात उबेरने तिच्या सर्व मोबिलिटी फ्लीटमध्ये वापरकर्त्यांसाठी प्रथमच पहिली राईड मोफत हा उपक्रम राबविला. तसेच या सहयोगातून १० विजेत्यांना लालबागचा राजाच्या विशेष व्हीआयपी दर्शनाची संधीही मिळाली. या उपक्रमाला बिग एफएमचे रेडिओ आणि सोशल प्लॅटफॉर्म तसेच उबरच्या ऑन-ग्राउंड उपस्थितीतून पाठबळ देण्यात आले. यामध्ये ब्रँडेड टचपॉइंट्स आणि दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांसाठी वेटिंग लाउंजचा समावेश आहे. सिट्रोएनच्या ऑन-ग्राउंड उपस्थितीमध्ये कार शोकेस आणि मसाज चेअर्ससह समर्पित कम्फर्ट झोन होते. त्यामुळे भाविकांना दर्शनानंतर विश्रांती घेण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आली.
लालबाग येथून बिग एफएमच्या लाइव्ह स्टुडिओचे स्थानांतर हे या वर्षीच्या क्रियाशीलतेच्या केंद्रस्थानी होते. त्यामुळे हे केंद्र लोकांच्या अधिक जवळ आले आणि महोत्सवाला आकार देणारे क्षण टिपण्यात आले. या स्टुडिओमध्ये थेट आरती कव्हरेज, मूर्तीचे अनावरण, सेलिब्रिटी आणि भक्तांशी संभाषणे, उत्सवाचे अपडेट्स आणि विसर्जन कव्हरेज ही विशेष आकर्षणे होती. तर लालबागला प्रवास करू न शकणाऱ्यांपर्यंत हा अनुभव बिग एफएमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मने पोहोचविला.
करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, प्रकाश जोग, विशाल-शेखर जोडीतील शेखर रावजियानी, ‘हनुमान अंश’ची संगीत टीम आणि अशा अनेक सेलिब्रिटींनी बिग एफएमच्या स्टुडिओला भेट दिली; त्यांनी बाप्पाशी संबंधित आपल्या उत्सवातील आठवणी आणि अनुभव येथे शेअर केले.
लालबागच्या राजाच्या मूर्तीकरांच्या कथेचा शोध घेणारी ‘मूर्ती मेकर ऑफ लालबाग’ ही रेडिओ माहितीपट मालिका या वर्षीच्या कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग ठरली. संभाषणे, आसमंतातील आवाज आणि वास्तविक कथांद्वारे या मालिकेने पिढ्यान् पिढ्या मुंबईच्या उत्सवाचे केंद्र बनलेल्या मूर्तीमागील कारागिरी आणि भक्तीवर दृष्टी टाकली. यावर्षीच्या कार्यक्रमामध्ये ‘ हुमन्स ऑफ लालबाग’चाही समावेश होता. यात भक्त, स्वयंसेवक, विक्रेते आणि कुटुंबांकडे मायक्रोफोन वळवून लालबागच्या राजाला एकत्रितपणे इतका सखोल वैयक्तिक उत्सव बनविणारे व्यक्तिगत अनुभव टिपण्यात आले.
‘नवासाला पावणारा गणपती’ अशी ओळख असलेला लालबागचा राजा राजेशाही थाटात विराजमान, पहा पहिली झलक
रिलायन्स ब्रॉडकास्ट नेटवर्क लिमिटेडचे सीईओ अशित कुकियन म्हणाले म्हणाले, यावर्षी आम्हाला केवळ दृश्यांच्या पलीकडे जाऊन उत्सवाचा आत्मा असणाऱ्या कहाण्या मांडायच्या होत्या – मूर्ती बनविणारे लोक, दरवर्षी येणारे भाविक, कुटुंबाच्या आठवणी आणि बदलत्या मुंबईतही स्थान टिकवून असणाऱ्या परंपरा सांगायच्या होत्या. यातच रेडिओची एक अनोखी भूमिका असते, यावर आमचा विश्वास आहे.”
हे १८ वे वर्ष संपत आले असताना ‘लालबागचा राजा’शी बिग एफएमच्या सहकार्यातून या उत्सवाला ओळख पुरवणाऱ्या कथा, आवाज आणि भावनांसाठी एक स्थान तयार होत आहे. त्यातून ‘लालबागचा राजा’चा मूळ रेडिओ भागीदार म्हणून सुमारे दोन दशकांत तयार झालेले नाते अधिक घट्ट होत आहे






