Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परमबीर सिंह यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर येणार टाच, बेनामी मालमत्तेचाही शोध सुरु – क्राईम ब्रँचच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे, मालमत्ता जप्तीची तयारी सुरु

बईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. कोर्टाने त्यांना फरार घोषित केल्यानंतर, आता त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त(Parambir Singh Property To Be Seized) करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Nov 19, 2021 | 05:57 PM
परमबीर सिंह यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर येणार टाच, बेनामी मालमत्तेचाही शोध सुरु – क्राईम ब्रँचच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे, मालमत्ता जप्तीची तयारी सुरु
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : खंडणी वसुली प्रकरणात(Extortion Case) फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh) यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. कोर्टाने त्यांना फरार घोषित केल्यानंतर, आता त्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँच या प्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरोधात ही कारवाई करण्याची शक्यता आहे. परमबीर सिंह यांची कोट्यवधीची संपत्ती असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. यातील काही संपत्तीची कागदपत्रेही क्राईम ब्रँचला मिळाल्याची माहिती मिळाली आहे.मुंबईच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी परमबीर यांना फरार घोषित केले आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत जर परमबीर पोलिसांना शरण आले नाही, तर त्यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे.

[read_also content=”पत्नीच्या अपमानामुळे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना कोसळले रडू, भावूक होत केली ‘ही’ भीष्मप्रतिज्ञा https://www.navarashtra.com/latest-news/chandrababu-naidu-cried-after-insult-of-his-wife-by-ysr-congress-nrsr-204100.html”]

जुहूत पाच कोटींचा फ्लॅट
परमबीर सिंह यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मुंबईतील जुहू परिसरात आयपीएस अधिकाऱ्यांच्या वसुंधरा सोसायटीत त्यांचा २५०० स्क्वेअर फुटांचा आलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत पाच कोटींच्या घरात आहे. हा फ्लॅट गेल्या काही वर्षांपासून भाड्याने देण्यात आलेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या घराच्या भाड्यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई होते आहे.

नेरुळमध्ये एक फ्लॅट आणि पाच मालमत्ता
नवी मुंबईतील नेरुळ परिसरात परमबीर यांचा एक फ्लॅट आणि उतर पाच मालमत्ता असल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली आहे. नेरुळच्या फ्लॅटची किंमत चार कोटींच्या घरात असून हाही भाड्याने देण्यात आलेला आहे. यातूनही त्यांना लाखो रुपये मिळत आहेत.

फरीदाबादमध्ये दोन मालमत्ता
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये दोन मालमत्ता आहेत. यात ४०० स्क्वेअर फूटांचा रिकामा प्लॉट आहे. चंदीगडमध्येही त्यांची पिढीजात मालमत्ता असल्याची माहितीही मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे. या मालमत्तेत त्यांच्या दोन भावांचाही हिस्सा आहे.

बेनामी मालमत्ता असल्याचाही संशय
परमबीर सिंह यांच्याकडे या मालमत्तांव्यतिरिक्त अजून बेनामी मालमत्ता असल्याचा पोलिसांना संशय आहे. अशा मालमत्तांचाही पोलीस शोध घेत आहेत. जर परमबीर २२ तारखेपर्यंत पोलिसांसमोर हजर झाले नाहीत, तर त्यांची कोट्यवधींची मालमत्ता जप्त होणार आहे.

मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये २२ जुलै रोजी परमबीर आणि पाच पोलिसांविरोधात तसेच दोन इतर व्यक्तिंविरोधात, एका बिल्डरकडून १५ कोटींची खंडणी मागण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशीही क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आली आहे.

Web Title: Parambir singh property to be seized by crime branch nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2021 | 05:54 PM

Topics:  

  • Parambir Singh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.