Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेचे केस ओढणं किंवा तिला ढकलणं विनयभंग….,मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

बाबा बागेश्वर धाम यांच्या शिष्याशी संबधित एका खटल्यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. भांडणादरम्यान महिलेची केस ओढणं किंवा तिला ढकलणं हा विनयभंग नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 08, 2024 | 12:55 PM
मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य - pinterest)

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितलं आहे की, भांडणादरम्यान महिलेची केस ओढणं किंवा तिला ढकलणं हा विनयभंग नाही. बाबा धीरेंद्र शास्त्री उर्फ ​​बाबा बागेश्वर धाम यांच्या शिष्याशी संबधित एका खटल्यावर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. बाबा बागेश्वर धाम यांचे अनुयायी आणि याचिकाकर्ते नितीन उपाध्याय यांनी काही आरोंपीविरोधात याचिका दाखल करत त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्यास नकार देत नितीन उपाध्याय यांची याचिका फेटाळून लावली.

हेदेखील वाचा- नागपुराच्या इतवारीत अत्तराच्या दुकानाला भीषण आग; एकाचा मृत्यू, तीनजण गंभीर जखमी

याचिकाकर्ते नितीन उपाध्याय यांनी दावा केला आहे की, अभिजीत करंजुले, मयूरेश कुलकर्णी, ईश्वर गुंजल, अविनाश पांडे आणि लक्ष्मण पंत या लोकांनी याचिकाकर्ते नितीन उपाध्याय यांना एक व्हिडिओ बनवण्यास सांगितले होतं, पण नितिन उपाध्याय यांनी व्हिडीओ बनवण्यास नकार दिल्याने, आरोपींनी नितीन उपाध्याय यांना मारहाण केली तसेच त्यांच्या पत्नीचे केस ओढले आणि तिला धक्का दिला. तसेच आरोपींनी नितीन उपाध्याय यांच्या मुलाला देखील चापट मारली. याप्रकरणी नितीन उपाध्याय यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपींविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी पार पडली असून भांडणादरम्यान महिलेची केस ओढणं किंवा तिला ढकलणं हा विनयभंग नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

हेदेखील वाचा- मुंबईला पाणीपुरवठा करणारी 5 धरणं पूर्ण क्षमतेने भरली; पवना धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ

काय आहे संपूर्ण प्रकरण

याचिकाकर्ते नितीन उपाध्याय महाराष्ट्रात बागेश्वर बाबा यांचे कार्यक्रम आयोजित करतात. याचिकाकर्ते नितीन उपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार, 5 आरोपी 9 मे 2023 रोजी त्यांच्या घरी आले. आरोपींनी नितीन उपाध्याय यांना बाबा बागेश्वर धाम एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी 3.50 कोटी रुपये मागत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सांगितले. त्यांनी व्हिडीओ तयार करण्यास नकार दिल्यावर, आरोपींनी नितीन उपाध्याय व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. आरोपींनी त्यांच्या मुलांनाही चापट मारली. नुकतीच एक क्लिप व्हायरल झाली होती ज्यामध्ये बाबा कोणत्याही राज्यात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी 3.50 कोटी रुपयांची मागणी करतात असा आरोप करण्यात आला होता.

या संपूर्ण प्रकारानंतर नितीन उपाध्याय यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत आरोपींविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी आता न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे की, विनयभंगाचा उद्देश एखाद्या महिलेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याचा हेतू असावा. केवळ केस ओढणे आणि गुन्हेगारी बळाचा वापर करणे म्हणजे विनयभंग होत नाही. गुन्हेगारी बल म्हणजे विनयभंग कसा होतो? गुन्हेगारी बळाचा वापर करून छेडछाड होऊ शकते का? यात छेडछाड करण्याचा हेतू कुठे आहे?

याप्रकरणी न्यायालयाने अभिजीत करंजुले, मयूरेश कुलकर्णी, ईश्वर गुंजल, अविनाश पांडे आणि लक्ष्मण पंत या आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यास न्यायालयाने नकार दिला असून भारतीय दंड संहिता कलम ३२३ (साधारण दुखापत) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला.

Web Title: Pulling a womans hair or pushing her during an argument is not molestation bombay high courts decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 12:44 PM

Topics:  

  • High court

संबंधित बातम्या

Asha Bhosale: आशा भोसलेंची AI विरुद्ध थेट हायकोर्टात याचिका; नेमका विषय काय?
1

Asha Bhosale: आशा भोसलेंची AI विरुद्ध थेट हायकोर्टात याचिका; नेमका विषय काय?

Karur Stampede: TVK ची रॅलीसाठी विनवणी, मद्रास हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय, आता काय होणार?
2

Karur Stampede: TVK ची रॅलीसाठी विनवणी, मद्रास हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय, आता काय होणार?

फसवणूक प्रकरणात राज कुंद्राच्या जवळच्या व्यक्तीचा तपास सुरु, मुंबई पोलिसांनी बजावले समन्स
3

फसवणूक प्रकरणात राज कुंद्राच्या जवळच्या व्यक्तीचा तपास सुरु, मुंबई पोलिसांनी बजावले समन्स

Sabrimala Temple Gold Missing: शबरीमाला मंदिरातील कोटींचे सोने गायब? सगळीकडे खळबळ; HC ने थेट….
4

Sabrimala Temple Gold Missing: शबरीमाला मंदिरातील कोटींचे सोने गायब? सगळीकडे खळबळ; HC ने थेट….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.