भारताच्या उद्योगजगताचा चेहरा, उद्योगपती रतन टाटा अनंतात विलीन झाले आहेत. वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. उद्योगपती रतन टाटा यांच्या अत्यंसस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह अनेक ज्येष्ठ उद्योगपती, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती उपस्थित होते.
सकाळी एनसीपीए येथे रतन टाटा यांचे पार्थिव दर्शनाकरिता ठेवण्यात आले होते त्याठिकाणी देशातील सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी दर्शन घेतले. त्यांच्या अंतिम यात्रेमध्ये सर्वसामान्य लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. रतन टाटा यांच्या जाण्याने उद्योगक्षेत्राचेच नव्हे तर देशाची हानी झाली असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, उद्योगपती रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. जगभरातूनही शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांनी देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी दिलेले योगदान हे अमुल्य होते. काही दिवसांआधी रतन टाटा यांना वृद्धापकाळामुळे रुटीन चेकअपसाठी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात नेण्यात आले होते, ही माहिती त्यांनी स्वतःच दिली होती. मात्र काल रात्री त्यांचे निधन झाले. हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शारुख अस्पी गोलवाला यांनी रतन टाटा यांच्यावर उपचार केले. मात्र त्याच्या वाढत्या वयामुळे रतन टाटा यांची प्राणज्योत मालवली.
रतन टाटा यांचे तीन दिवसांपूर्वी ब्लड फ्रेशर कमी झाले होते. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ब्लड प्रेशर डाऊन झाल्यामुळे त्यांची तब्येत पूर्णपणे बिघडून गेली होती.कमी रक्तदाबाची समस्या उद्भवल्यानंतर शरीरातील अवयव काम करणं बंद करतात. तसेच रतन टाटा यांना डिहायड्रेशनची समस्या देखील उद्भवली होती.