mahavikas aaghadi
Maharashtra Assembly Elections: विदर्भातील जागांवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना यश आल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटात विदर्भातील जागेवरून सुरु झालेला वाद दिल्लीपर्यंत पोहचला होता. काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाकडून सुरू असलेल्या दबावतंत्रांचा दिल्लीत पाढाच वाचण्या आला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही मातोश्रीवर आमदारांना एकत्र बोलवत टोकाची भूमिका घेण्याची तयारी दर्शवली होती.
पण, ठाकरे गट काँग्रेसच्या वादात मध्यस्थी करत शरद पवार यांनी हा वाद मिटवल्याचे सांगितले जात आहे. शऱद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांना फोनाफोनी करत या वादाला पूर्णविराम दिला आहे. त्यानंतर मंगळवारी (22 ऑक्टोबर) महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल, असेही सांगितले जात आहे.
हेही वाचा:मध्यपूर्वेतील तणावामुळे जगभरात दहशतवाद वाढणार; माजी MI6 एजंटचा धक्कादायक खुलासा
दरम्यान, महाविकास आघाडीतील नेते काल रात्रीपर्यंत बैठका घेत होते. काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागावाटपावरून वाद होते. पण त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची चर्चेदरम्यान असलेली भाषाही या वादाचं दुसरं कारण होती. नाना पटोले सौम्य भाषेत चर्चा करत नाही.एकेरी भाषेचा वापर करतात असा आरोप, ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला होता. त्यावरून हा वाद चांगलाच चिघळला होता.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही आपापसात वाद न घालता काँग्रेस हायकमांडनेच यावर लक्ष घालून निर्णय घेतल्याचे सांगितले. तर शरद पवार यांनीही या वादात मध्यस्थी करण्याती विनंती दोन्ही गटाकडून करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून या वादावर पडदा टाकला.
हेही वाचा‘या’ 8 ठिकाणांचा रामायणाशी आहे विशेष संबंध, तुम्हीही नक्की भेट द्या
शरद पवार यांनीही काँग्रेस हायकमांडसोबत चर्चा केल्यानंतर जयंत पाटील यांना मातोश्रीवर पाठवत दिल्लीतील हायकमांड सोबत जालेल्या चर्चेची माहिती दिली. शरद पवारांची मध्यस्थी कामी आली असून महाविकास आघाडीचं जागावाटप आज संध्याकाळी किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे.