'या' 8 ठिकाणांचा रामायणाशी आहे विशेष संबंध, तुम्हीही नक्की भेट द्या
आपल्या सर्वांनाच परिचित असणाऱ्या रामायणाशी संबंधित काही ठिकाणांविषयी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या ठिकाणांचा रामायणाशी जवळचा संबंध आहे. शिवाय रामायणात या ठिकाणांचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. अयोध्या, चित्रकूट आणि रामेश्वरम यांसारखी प्रभू रामाशी संबंधित तीर्थक्षेत्रे केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीकच नाहीत तर सुट्टीची अतिशय आकर्षक ठिकाणेही आहेत. येथे भेट दिल्याने भक्तांना आध्यात्मिक शांती मिळते आणि त्यांना रामायणातील पौराणिक कथांची जाणीव होते. तुम्हालाही रामायणाशी संबंधित या ठिकाणांना भेट द्यायची असेल तर आज आम्ही तुम्हाला काही ठिकाणांबद्दल सांगत आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
अयोध्या हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील सरयू नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. प्रभू रामांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक प्रमुख मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत. अयोध्या शहाराला प्रभू रामांच्या इतिहासाचा वारसा लाभलेला आहे.
हेदेखील वाचा- चीनचे हे गाव आजही न सुटलेले कोडेच! अर्ध्या लोकसंख्येची उंची 3 फुटांपेक्षा कमी
चित्रकूट येथे राम, लक्ष्मण आणि सीता यांनी अनेक वर्षे वनवासात घालवली. रामघाट आणि कामदगिरी पर्वत ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. चित्रकूट हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील सतना जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आणि नगर पंचायत आहे. या गावाला धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व आहे.
जनकपूर हे नेपाळचे प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे. प्रसिद्ध राजा जनक येथे राहत होता. जनकपूर हे माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते. जनक मंदिर हे येथील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
पंचवटी हे नाशिकच्या गोदावरी नदीच्या काठावर असलेले प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. त्रेतायुगात श्रीरामांनी लक्ष्मण आणि सीतेसह काही काळ वनवासात घालवले होते. राम, लक्ष्मण आणि सीता यांनी वनवासात घालवलेले सीता गुहा आणि काळाराम मंदिर हे या ठिकाण आहे.
हेदेखील वाचा- ही 5 ठिकाणं आहेत ऐतिहासिक अवशेषांच्या सौंदर्याची उदाहरणं, वास्तुकला आणि कोरीव काम पाहून आश्चर्यचकित व्हाल
सिद्धपीठ श्री हनुमान गढ़ी हे उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या शहरातील भगवान हनुमानाचे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. अयोध्येत असलेले हे मंदिर हनुमानजींना समर्पित आहे. असे मानले जाते की हनुमान येथून अयोध्येचे रक्षण करत असत.
हे ते ठिकाण आहे जिथून प्रभू रामांनी लंकेवर आक्रमण करण्यासाठी पूल बांधला होता. रामनाथस्वामी मंदिर हे येथील मुख्य आकर्षण आहे.
कर्नाटकातील हम्पीपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले अनेगुंडी हे ठिकाण रामायण काळातील किष्किंधा शहर म्हणून ओळखले जाते. येथील अंजनेय पर्वत, बाली किल्ला, सुग्रीवाची गुहा, तारा पर्वत आणि पंपा सरोवर प्रसिध्द आहे.
लंका ते ठिकाण आहे जिथे रावणाची लंका होती. अशोक वाटिका, राम रावणाचे युद्धभूमी, रावणाची गुहा, रावणाचे विमानतळ, रावणाचा राजवाडा आणि रामायण काळाची ओळख करून देणारी इतर ठिकाणे आहेत.