मंत्रिपद नाकारलेल्या 'या' बड्या नेत्याला मिळणार विशेष जबाबदारी; भाजपकडून विचार सुरु
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनात पार पडला. यामध्ये नवीन 39 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांची कमालीची नाराजी पाहिला मिळत आहे. पण, आता त्यांना विशेष जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती दिली जात आहे.
देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ 3.0 मध्ये स्थान न मिळालेल्या महायुतीच्या नाराज आमदारांची मनधरणी करणे महायुतीतील प्रमुख नेत्यांना अडचणीचे ठरत आहे. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांच्यासह अनेक दिग्गजांनी दांडी मारली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिपदावरून आपले नाव अनपेक्षितपणे वगळल्याने संतप्त झालेले मुनगंटीवार पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या घरी तक्रार घेऊन पोहोचले.
विधिमंडळात गैरहजर
सोमवारी नागपुरात असूनही हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुनगंटीवार अनुपस्थित राहिले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचा दावाही मुनगंटीवार यांनी फेटाळून लावला.
मुनगंटीवारांना मिळणार विशेष जबाबदारी
सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चांगली चर्चा झाली. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. काही जणांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे त्यांना विशेष जबाबदारी देण्याचा पक्षाचा मानस आहे. आम्हाला पक्ष आणि सरकार दोघांनाही चालवावे लागते. आमच्या केंद्रीय नेतृत्वाने काही विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. लवकरच त्यांच्याबाबत चांगला निर्णय घेतला जाईल.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुलांनी इतर पक्षातून निवडणूक लढविलेल्यांना मिळाले मंत्रिपद
मुनगंटीवार यांचे पुढे काय होणार हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मुनगंटीवार स्वतः : केंद्रीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी गेले. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दीड तास चर्चा झाली. गडकरी हे माझे गुरू आहेत, त्यामुळे मी त्यांना भेटलो, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, माझे नाव मंत्रिमंडळात नाही. मी आज मंत्री नसलो तरी मला काळजी करण्याचे कारण नाही.
अनेक नेतेमंडळींची दिली उदाहरणे
किशोर जोगरेवार आणि गणेश नाईक यांची उदाहरणे देत ते म्हणाले की, ज्यांची मुले इतर पक्षात जाऊन निवडणूक लढवतात त्यांना मंत्रिपदे देण्यात आली. तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस आधी फडणवीस आणि बावनकुळे यांनी माझे नाव मंत्र्यांच्या यादीत असल्याचे सांगितले होते. मात्र, नंतर मला मंत्रिपद मिळाले नाही.
हेदेखील वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; राज्यसभाही नाकारली