Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार,मग स्मारक का होत नाही? संभाजीराजे छत्रपतींकडून सवाल उपस्थित

मुंबईजवळ अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. याचदरम्यान शिवस्मारक शोधायला चला असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून संभाजीराजे छत्रपती यांनी भाजप आणि शिवसेनेला प्रश्न विचारले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 06, 2024 | 02:08 PM
केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार,मग स्मारक का होत नाही? संभाजीराजे छत्रपतींकडून सवाल उपस्थित (फोटो सौजन्य-X)

केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार,मग स्मारक का होत नाही? संभाजीराजे छत्रपतींकडून सवाल उपस्थित (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईचा अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारु, अशी स्वप्ने गेल्या तीन दशकात राज्यात अनेक सरकारे दाखवली. 24 डिसेंबर 2016 रोजी भाजप-शिवसेना आघाडी सरकारने अतिशय भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. स्मारकाचे काम सुरू झाल्याच्या अनेक बातम्या आल्या.

तर दुसरीकडे सरकारी नोंदी किंवा स्मारकांवरही कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही.चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.

संभाजीराचे छत्रपती यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीनं कार्यकर्ते चला शिवस्मारक शोधायला या मोहिमेसाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे जमले असून यावेळी संभाजीराजे यांनी भाष्य केले.

केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, मग अरबी समुद्रातील शिवस्मारकचं काय झालं? शिवस्मारकाचा अंदाजे खर्च 70 कोटी आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाली तेव्हा आम्हाला आनंद झाला. देशाच्या आर्थिक राजधानीत शिवाजी महाराजांचे सुशोभित स्मारक होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवस्मारकात जलपूजन केले. केवळ आठ वर्षे उलटूनही शिवस्मारकाचे (शिवाजी महाराज स्मारक) सुरू झालेले नाही. गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण महाराष्ट्रात अजून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहिला नाही, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

काय म्हणाले संभाजीराजे?

कोणत्याही प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन होते तेव्हा सर्व परवानग्या असणे गरजेचे होते. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. हे स्मारक कुठे आहे? त्यामुळे आम्ही स्मारकाचे संशोधन करण्याची मोहीम सुरू केली आहे. सरकारने राज्यातील 13 कोटी जनतेला उत्तर द्यावे. आम्ही कायदा हातात घेणार नाही, असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

स्मारकाच्या ठिकाणी असलेले आमचे बोर्ड काढून टाकले आहेत. परंतु महायुतीचे बोर्ड तसेच आहेत. आम्ही समुद्रात स्मारकाच्या पाहणीसाठी जाणार आहोत. परंतु ज्या बोटने जाणार आहोत, त्या बोटवाल्यांना भाजपकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना परवाना रद्द करण्याची धमकी दिली गेली आहे.

Web Title: The bjp is in power at the centre and in the state so why is there no memorial questions raised by sambhajiraje chhatrapati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 02:08 PM

Topics:  

  • Sambhaji Raje Chhatrapati

संबंधित बातम्या

Laxman Hake : वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद चिघळण्याची शक्यता; या नेत्याने केला समाधी हटवण्यास विरोध
1

Laxman Hake : वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद चिघळण्याची शक्यता; या नेत्याने केला समाधी हटवण्यास विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.