Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! आता लवकरच जिल्हा बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येणार; प्रशासक नेमणार

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार बँकेचा प्रभारी कारभार जुन्या संचालक मंडळाकडे न देता प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 30, 2026 | 09:26 AM
मोठी बातमी ! आता लवकरच जिल्हा बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येणार; प्रशासक नेमणार

मोठी बातमी ! आता लवकरच जिल्हा बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात येणार; प्रशासक नेमणार

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील 13 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक मंडळ टप्याटप्याने बरखास्त करण्यात येणार आहे. बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम २०२५ नुसार ठाणे, यवतमाळ, नांदेड जिल्हा बँकांचे संचालक मंडळ बरखास्त होऊन जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासक म्हणून बँकेचा कारभार हाती घेतला आहे.

वर्षभरात मुदत पूर्ण होऊ घातलेल्या आणखी काही बँकांचे संचालक मंडळ बरखास्त होणार आहेत. त्यामध्ये संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, धुळे, जळगाव, जालना, अहिल्यानगर, सोलापूर, बीड जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणूक अपेक्षित आहेत. बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम २०२५ नुसार सलग दहा वर्ष संचालकपद भूषवणारे संचालक हे पुढील निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज नेते, सहकार महर्षींना झटका बसला आहे.

यापूर्वी बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतरही निवडणुका होईपर्यंत बँकेचा कारभार जुने संचालक मंडळ हाकायचे. मात्र, केंद्र सरकारने बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम २०२५ ची मंजूर केला आणि अनेक नियम बदलण्यात आले. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार बँकेचा प्रभारी कारभार जुन्या संचालक मंडळाकडे न देता प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय झाला.

धोरणात्मक निर्णयास मनाई

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून बँकेचा कारभार स्वीकारला आहे. विभागीय सहनिबंधकांच्या आदेशानुसार प्राधिकृत अधिकारी यांनी निबंधकाच्या सर्वसाधारण नियंत्रणाखाली कामकाज करणे बंधनकारक असून, त्यांना कोणतेही धोरणात्मक निर्णय निबंधकाच्या पूर्वपरवानगीशिवाय परस्पर घेता येणार नाहीत, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

संचालक मंडळ बरखास्त का झाले?

बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम २०२५ नुसार सलग दहा वर्ष संचालकपद भूषविणारे संचालक हे पुढील निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना पदावर न ठेवता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ अ (३) (१) (ब) यातील तरतुदीनुसार बँकेचा प्रभारी कारभार जुन्या संचालक मंडळाकडे न देता प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय झाला.

नवीन कायद्याची अंमलबजावणी

‘अ’ वर्ग सहकारी संस्थेत मुदत संपलेले संचालक मंडळ कार्यरत ठेवू नये, त्या ठिकाणी प्रशासकच नियुक्त करावा, असा नवीन कायदा करण्यात आला. त्यानुसार बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा बँकांवरील राजकीय पकड सैल होणार; नव्या नियमामुळे बदलणार राजकारण, नेत्यांचे धाबे दणाणले

Web Title: The boards of directors of district banks are set to be dissolved very soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 09:26 AM

Topics:  

  • Bank Employee

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.