मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि दैनिक ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादिका रश्मी ठाकरे यांच्या विरोधात अॅयड. डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचे अॅवड. पाटील यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करून रश्मी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अॅाड. पाटील यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी व मुलगा आदित्य ठाकरे यांच्या कडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करत अॅड. जयश्री पाटील यांनी लोकयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. ध्वजारोहणावेळी रश्मी ठाकरे यांच्याकडून राष्ट्रध्वजाला सॅल्यूट करण्यात आला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांना नियमबाह्य पद्धतीनं रेड कार्पेटवर बोलविण्यात आल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याचा आरोप जयश्री पाटील यांनी केला आहे. ध्वजारोहणाच्या वेळी रश्मी ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सॅल्यूट केला नाही, तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना नियमबाह्य पद्धतीनं रेड कार्पेटवर बोलविण्यात आले. हा अचारसंहितेचा भंग ठरत असल्याचे जयश्री पाटील यांनी म्हटले आहे. याविरोधता जयश्री पाटील यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच याप्रकरणी लोकायुक्तांकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार अॅड. जयश्री पाटील यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रध्वजाला सलामी देताना डोक्यावर गांधी टोपी घातली नाही. पण याबद्दल माझा काही आक्षेप नाही, कोणी एम. के. गांधी यांच्या विचारांचे तर कोणी श्रीमान नथुराम गोडसे यांच्या विचाराला मान्यता देऊ शकतात. तो त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. पण प्रजासत्ताक दिनी रेड कार्पेटवर ध्वजवंदन करणारे उपस्थित असतात, यावेळी न विसरता सलामी द्यायची असते. पण मुख्यमंत्र्यांच्या पत्नी या रेड कार्पेटवर ध्वजारोहणानंतर सलामी देत नाहीत, हे कोणतं शहाणपण? त्यांना ध्वज संहिता आणि प्रजासत्ताक मान्य नाही का? सार्वजनिक जीवनात ध्वजसंहितेचा अपमान करणे हे हिंदुस्थानी भारतीय नागरिकांचा सार्वजनिकरित्या भावनांचा अपमान केल्यासारखं आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रगीताचा अपमान या संबंधी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडून अक्षम्य अपराध झाला आहे. त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा”