Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुळा-मुठा होणार सुंदर आणि प्रदूषणमुक्त; मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

  • By युवराज भगत
Updated On: May 10, 2024 | 04:59 PM
Mutha will be beautiful and pollution-free; Muralidhar Mohol assured

Mutha will be beautiful and pollution-free; Muralidhar Mohol assured

Follow Us
Close
Follow Us:
पुणे : मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्प (जायका) शहराची पुढील पंचवीस वर्षांची गरज लक्षात घेऊन निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्प आणि नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण करणार असल्याची ग्वाही पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोरे विद्यालय परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन
मोरे विद्यालय परिसरात मोहोळ यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्राताई वाघ, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दीपक मानकर, माजी नगरसेविका मंजुश्रीताई खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेवक जयंत भावे, ऍड वर्षा डहाळे, पुनीत जोशी, डॉ. संदीप बुटाला, अनुराधा येडके, अपर्णा लोणारे, कुलदीप सावळेकर, मिताली सावळेकर, शंतनू खिलारे पाटील, विठ्ठल बराटे, हर्षवर्धन मानकर, दीपक पवार, सचिन थोरात, अजय मारणे, अभिजीत राऊत, संदीप मोरे, आशुतोष वैशंपायन यांचा प्रमुख सहभाग होता.
11 नवीन अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
मोहोळ म्हणाले, “मुळा-मुठा पुनर्जीवन प्रकल्पात 11 नवीन अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प,  55 किलोमीटर लांबीच्या नव्या सांडपाणी वाहिन्या आणि दररोजची सांडपाणी प्रक्रिया क्षमता 396 दशलक्ष मीटरने एमएलडीने वाढणार आहे. सन 2046 मध्ये 99 लाख लोकसंख्येचा विचार करून प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पाशिवाय 500 कोटी रुपये खर्च करून जुन्या दहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे अत्याधुनिकरण सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत 11 पैकी दहा प्रकल्पांचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून, आयात केलेली विद्युत यंत्रणा पुण्यात पोहोचली आहे. सन 2025 च्या मध्यास काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.”
नदीकाठ सुशोभिकरण प्रकल्पाचे भूमिपूजन
मोहोळ पुढे म्हणाले, “नदीकाठ सुशोभिकरण या दुसऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी झाले. पहिल्या टप्प्यात येरवडा येथील डॉ. चिमा उद्यान येथे 350 मीटर लांबीचा पथदर्शी प्रकल्प पूर्ण केला असून, पहिल्या दोन टप्प्यांचे काम सुरू आहे. नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करणे, वहन क्षमता वाढवून पुराचा धोका कमी करणे, संपूर्ण नदीकाठ नागरिकांच्या वापरासाठी खुला करणे, नदी पात्र वाहते ठेवणे, ऐतिहासिक वास्तू, मनोरंजन, धार्मिक, सांस्कृतिक केंद्र प्रकल्पाशी जोडणे, दोन्ही नद्यांच्या दोन्ही काठांवर 44 किलोमीटर जॉगिंग ट्रॅक सायकल ट्रॅक, नदीकाठापर्यंत जाण्यास 217 प्रवेश मार्ग, काही ठिकाणे उद्याने, 16 ठिकाणी बोटींगची सुविधा, नदीकाठांवर पूर्वीचे व नवीन असे 50 घाट असणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांमुळे मुळा-मुठा नद्या सुंदर आणि प्रदूषणमुक्त होतील, त्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा मी करीन याची काळजी देतो.”

Web Title: Muralidhar mohol assured mulla mutha river will be beautiful and pollution free nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2024 | 04:59 PM

Topics:  

  • Pune Lok Sabha constituency

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.