मुंबई : समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाचे राजकारण रंगण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. समृद्धी महामार्गाबाबत कोणीही कितीही प्रयत्न केले तरी माझे नाव त्यांना मिटवता येणार नाही. हे जनतेचे श्रेय आहे. त्यांनी मला तेव्हा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली म्हणून मी समृद्धी महामार्गाबाबत निर्णय घेऊ शकलो(My name cannot be erased from ‘smarudhhi highway Devendra Fadnavis’s Mahavikas Aghadi slammed the government).
२० वर्षांपासून ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. त्यामुळे आता कोणीही हे श्रेय हिरावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना यश मिळणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनाला राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यापासूनही राज्य सरकार फडणवीसांना बाजूला ठेवणार का, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी विचारले असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, त्यावेळी समृद्धी महामार्गाच्या उभारणीला जे लोक विरोध करत होते, ते लोकही आज रस्त्याच्या उद्घाटनासाठी प्रयत्न करत आहेत. हे पाहून मला आनंद वाटतो.
ठाकरे सरकार १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु, समृद्धी महामार्गाचे संपूर्ण काम अद्याप पूर्ण झालेले नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. समृद्धी महामर्ग सुरु होतोय, या गोष्टीचा मला आनंद आहे. पण समृद्धी महामार्गाची सर्व कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.
ती काम पूर्ण करूनच या महामार्गाचे उद्घाटन झाले पाहिजे. घाईघाईत समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले तर अपूर्ण कामांमुळे या महामार्गाचे महत्व कमी होईल, अशी चिंता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]