पीएम आवास योजनेचा पहिला हफ्ता मिळाल्यानंतर आता पुढचा निधी काय मिळेना; लाभार्थी चिंतेत
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने पीएम आवास योजनेतील घरकुलांना मंजुरी दिली. पहिला हप्ताही दिला. त्यामुळे कामे सुरू झाली अन् आता पुढील निधीच मिळत नसल्याने लाभार्थी हैराण आहेत. पीएम आवास योजनेत ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. यासाठी राज्याला तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट होते.
हेदेखील वाचा : राष्ट्रीय समाज पक्ष परंडा विधानसभा लढवणार; पक्षनिरीक्षक ॲड. विकास पाटील यांची माहिती
राज्यातील 34 जिल्ह्यांना उद्दिष्ट देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी या योजनेत घाईघाईने लाभार्थी निवड करण्यात आली. पहिला हप्ता वितरित करण्यात आल्यानंतर पुन्हा त्यात काही प्रगती झाली नाही. हा पहिला हप्ता खर्च केल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावीत, या उद्देशाने पदरमोड केली. मात्र, त्यांना आता निधीची प्रतीक्षा लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर ज्यांना हे शक्य नव्हते, त्यांचे घरकुल आता पैशांअभावी ठप्प पडले असून, पावसाळ्याच्या दिवसांत अनेक जण उघड्यावर राहात आहेत.
या योजनेत 1 लाख 20 हजार रुपये घरकुलासाठी दिले जातात. मनरेगात 21 हजारांपर्यंत मजुरीवरील खर्च मिळू शकतो. जर पूर्वीचे स्वच्छतागृह नसेल तर त्यासाठी 12 हजार मिळून एसबीएममध्ये मिळू शकतात. आधीच शासनाकडून तोकडी रक्कम मिळत असताना हप्ताही वेळेवर मिळत नसल्यास गैरसोय होणारच आहे.
हेदेखील वाचा : तुम्हाला झक मारायला ठेवलंय का?; अजित पवारांनी अधिकाऱ्याला सर्वांसमोरच झापलं