Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : खुशखबर! दलालांशिवाय घरबसल्या मिळणार भाड्याचे घर; म्हाडाची नवी व्यवस्था नेमकी आहे तरी काय?

Nagpur : भाड्याने घर शोधणारे नागरिक आणि घरमालकांसाठी राज्य शासन मोठी डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील भाडे गृहनिर्माण व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभकरण्यासाठी म्हाडाकडून 'महाराष्ट्र राज्य रेंटल गृहनिर्माण पोर्टल' विकसित करण्यात येत आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 03, 2026 | 03:00 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • भाड्यांच्या घराचे डिजिटल मार्केटप्लेस
  • घरबसल्या डिजिटल भाडेकरार
  • ऑनलाईन पोलीस पडताळणी
Nagpur : डिजिटल प्लॅटफॉर्मवर शासकीय संस्था, खासगी विकासक तसेच सामान्य घरमालकही घरे भाड्याने देण्यासाठी नोंदणी करू शकणार आहेत. ओला-उबरच्या धर्तीवर तयार करण्यात येणाऱ्या पोर्टलद्वारे भाडेकरू आणि घरमालकांना थेट डिजिटल माध्यमातून जोडण्यात येणार आहे.

Nagpur News : विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीचा वाद आता हायकोर्टात ! राज्यसरकार सह प्रतिवादींना नोटीस .

पोर्टलच्या निर्मितीसाठी आवश्यक प्रक्रिया म्हाडाने सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, मुंबई आणि पुणे येथे ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. नागपूरमध्ये ही सेवा महापालिका हद्दीसह ग्रामीण भागातील काही परिसरांपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच एनएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनाही या सुविधेचा लाभ मिळू शकतो.
घरबसल्या डिजिटल भाडेकरार पोर्टलवर ई-केवायसी आणि डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून घरबसल्या भाडेकरार तयार करता येणार आहे. तसेच – भाडे आणि अनामत रक्कम (डिपॉझिट) – यांचे व्यवहार यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे – थेट पोर्टलवरून करता येणार आहेत.

वाद निवारणाची ऑनलाईन सुविधा

भाडेकरू आणि घरमालक यांच्यात उद्भवणाऱ्या वादांचे निराकरण करण्यासाठी पोर्टलवर स्वतंत्र ऑनलाईन केस मॅनेजमेंट प्रणाली उपलब्ध राहणार आहे. त्याद्वारे तक्रारींची नोंद, सुनावणी आणि निपटारा डिजिटल माध्यमातूनच केला जाणार आहे.
एआय करणार बनावट छायाचित्रांची पडताळणी अनेकदा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर घरांची दिशाभूल करणारी
किंवा जुनी छायाचित्रे अपलोड केली जातात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. एआय प्रणाली अपलोड केलेल्या छायाचित्रांची सत्यता तपासून बनावट किंवा चुकीची छायाचित्रे तत्काळ नाकारेल. त्यामुळे पोर्टलवर केवळ अचूक आणि विश्वासार्ह माहितीच उपलब्ध होणार आहे.

ऑनलाईन पोलीस पडताळणी

हे पोर्टल पोलिस विभागाच्या डिजिटल प्रणालीशी (एपीआय) जोडण्यात येणार असल्याने घरमालक आणि भाडेकरू यांची पोलिस पडताळणी पूर्णपणे ऑनलाईन आणि कमी वेळेत होऊ शकणार आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांच्या वारंवार फैन्यांची गरज राहणार नाही .

AI च्या मदतीने ३६०अंश व्हर्चुअल टूर

पोर्टलचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना घरबसल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘३६० अंश व्हच्र्युअल टूर’ घेता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर वारंवार भेट देण्याची गरज भासणार नाही. मोबाईल किंवा संगणकावरूनच घरातील प्रत्येक खोली आणि परिसर प्रत्यक्ष पाहिल्यासारखा अनुभव घेता येणार असल्याने वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे.

AIIMS Nagpur : शस्त्रक्रियेसाठी तीन-तीन महिने वाट; रुग्णांच्या वाढल्या फेऱ्या..

ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे व्यवहार अधिक सुरक्षित

पोर्टलमध्ये डेटा आणि भाडेकराराची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. एकदा नोंदवलेला भाडेकरार, शासकीय आदेश किया व्यवहाराची माहिती कोणालाही बदलता किंवा हटविता येणार नाही. प्रत्येक कराराला स्वतंत्र डिजिटल ओळख (युनिक कोड) देण्यात येणार असल्याने दस्तावेजांची सत्यता सहज पडताळता येईल. नागरिकांच्या मदतीसाठी २४ तास हेल्पडेस्क आणि मराठी, हिंदी व इंग्रजी भाषामध्ये मार्गदर्शन करणारा कत्रिम बुद्धिमतेवर आधारित वेंटबॉटही उपलब्ध राहणार आहे.

Web Title: Nagpur good news rent a home from the comfort of your own housewithout middlemen what exactly is mhadas new system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • MHADA Homes

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.