फोटो सौजन्य AI
प्रत्यक्षात किती रुग्णालयांची झाडाझडती झाली आणि कुठे नियमांची पायमल्ली सुरू आहे, याचा ठोस डेटा समोर येणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या समितीच्या बैठकीत आरोग्य सेवेतील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
Nagpur News : नागपूरची हवेत भरारी! देशाच्या टॉप-१०मध्ये एन्ट्री; महाराष्ट्रात तिसरा क्रमांक
शहरात बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रक्टिस करणाऱ्या संशयित बोगस डॉक्टरांचे जाळे उद्धवस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक झोनल वैद्यकीय अधिकाऱ्याने कार्यक्षेत्रात शोधमोहीम राबवावी, नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन विशेष पथकांद्वारे अचानक तपासण्या कराव्यात आणि दोषींवर थेट कायदेशीर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश बैठकीत दिले.
Nagpur News : क्रीडा क्षेत्रात मनमानी; महिला प्रशिक्षकाला हटवण्याची धमकी
मनपाच्या स्वतःच्या आरोग्य केंद्रांमधील सेवांच्या गुणवत्तेबाबत सभापतींनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. कोणत्याही आरोग्य केंद्रात मुदत संपलेली औषधे आढळल्यास कोणतीही गय न करता संबंधित झोनल वैद्यकीय अधिकारी आणि फार्मसिस्टला थेट जबाबदार धरून कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!
नागपूर मनपा हद्दीतील ६६२ नौदणीकृत खाजगी रुग्णालयांची कसून तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. मोहिमेत प्रामुख्याने खालील बाबींची पडताळणी केली जाईल, सुविधा व सुरक्षा रुग्णालयातील एकूण खाटांची संख्या, अग्निशमन यंत्रणा आणि जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे आहे की नाही.
पारदर्शकता रुग्णांचे अधिकार आणि उपचारांचे दरपत्रक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील. कायद्याचे पालन : ‘महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी कायद्या ‘तील नियमांचे काटेकोर पालन सर्व खाजगी रुग्णालयांना करावेच लागेल.






