Sword Hanging On Everyone From Chaprasha To Senior Officers Recommendation Of Inquiry Against 19 Persons Nraa
चपराशापासून ते बड्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांवर टांगती तलवार, १९ जणांविरोधात चौकशीची शिफारस
कालच्या शेवटच्या सभेत बोगस कंत्राट घोटाळ्याचा चौकशी अहवाल सादर झाला. तर, यात बऱ्याच बड्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले. यात मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी संजय चिलकर (Officer Sanjay Chilkar) यांची भूमिका संदिग्ध आहे.
नागपूर : महापालिकेतील बहुचर्चित असलेल्या स्टेशनरी घोटाळ्यात चपराशापासून ते बड्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. बोगस कंत्राट घोटाळ्याची सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून आता चौकशी होणार आहे. मागच्या पाच वर्षांच्या कंत्राटाची चौकशी करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहे. कालच्या शेवटच्या सभेत बोगस कंत्राट घोटाळ्याचा चौकशी अहवाल सादर झाला. तर, यात बऱ्याच बड्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले. यात मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी संजय चिलकर (Officer Sanjay Chilkar) यांची भूमिका संदिग्ध आहे.
[read_also content=”युक्रेनमध्ये अडकलेला हिंगणघाटचा यश मोटवानी हिंगणघाट येथे सुखरूप दाखल https://www.navarashtra.com/wardha/vidarbha/wardha/success-of-hinganghat-stuck-in-ukraine-motwani-arrives-safely-at-hinganghat-nraa-248096.html”]
यात मनपाचे तत्कालीन वित्त व लेखा अधिकारी, सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी, ॲलोपॅथी कम्पाउंडर, उच्च श्रेणी लिपिक, स्टोअर किपर यांच्यासह १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. सहभागी सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अविनाश ठाकरे यांच्या नेतृत्वातील सहा सदस्यीय चौकशी समितीने अहवालातून केली आहे.
[read_also content=”खासदार नवनीत राणा यांची तक्रार अन् …… अमरावती आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस https://www.navarashtra.com/amravati/vidarbha/amravati/mp-navneet-ranas-complaint-and-notice-to-amravati-and-mumbai-police-commissioners-nraa-248073.html”]
या घोटाळ्यात लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, संजय ठाकरे, सहायक आयुक्त महेश धामेचा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ. नरेंद्र बहीरवार, डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, लेखा अधिकारी राजेश मेश्राम, स्टोअर विभागाचे प्रमुख प्रशांत भातकुलकर, ज्येष्ठ लिपिक मो. अफाक अहमद, कराडे, लिपीक मोहन पडवंशी, सनीस गोखे, कनिष्ठ अभियता सुरेश शिवणकर, लिपीक सुनीता शाहू, अन्न निरीक्षक सुनीता पाटील यांच्यावर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकार्यांची व कर्मचार्यांची एक वर्षाची वेतनवाढ थांबाविण्यात यावी. सहभागी व्यक्तींचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात यावे, अशी शिफारस समितीने केली आहे.
[read_also content=”ऊर्जामंत्री नितीन राऊत हे मानसिक रोगी आहे, त्यांनी डॉ. केळकरांकडे इलाज केल्यास तो खर्च वंचित करेल, असा टोल अशोक सोनोने यांनी लगावला आहे https://www.navarashtra.com/buldhana/vidarbha/buldhana/energy-minister-nitin-raut-is-a-mental-patient-ashok-sonone-has-said-that-if-he-treats-kelkar-he-will-be-deprived-of-expenses-nraa-248017.html”]
मनपाच्या आरोग्य (एम), घनकचरा, जन्म-मृत्यू, ग्रंथालय, अशा चार विभागांतील ५ कोटी ४१ लाख ३२२ रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. हा घोटाळा एका विभागापुरता नसून अन्य विभागातही घोटाळा झाल्याचा अभिप्राय अहवालात नोंदविण्यात आला आहे. हा अहवाल महासभेत सादर करण्यात आला. त्यानंतर अहवालातील शिफारशीनुसार कारवाईचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी दिले. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयुक्तांनी तातडीने प्रशासकीय सुधारणा करावी, अशी सूचना केली आहे.
Web Title: Sword hanging on everyone from chaprasha to senior officers recommendation of inquiry against 19 persons nraa