Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बोलघेवड्या शिंदे-फडणवीसांपेक्षा महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर सरस; नाना पटोलेंची शिंदे सरकारवर टीका

  • By युवराज भगत
Updated On: Sep 16, 2023 | 05:07 PM
बोलघेवड्या शिंदे-फडणवीसांपेक्षा महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर सरस; नाना पटोलेंची शिंदे सरकारवर टीका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने उत्तम कामगिरी करीत आपल्या कामाचा ठसा उमटला होता. कोरोनाचे दोन वर्षांचे भीषण संकट, भाजपाकडून केंद्रीय संस्था आणि राज्यपालांच्या माध्यमातून केली जाणारी षडयंत्रे यावर मात करीत राज्यातील गुंतवणूक व रोजगार निर्मितीत मविआ सरकारने फडणवीस व शिंदे सरकारपेक्षा सरस कामगिरी केली आहे. स्वतःची पापं झाकण्यासाठी ऊठसूठ महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजप प्रणित एकनाथ शिंदे सरकारला ही मोठी चपराक आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

आकडेवारीनुसार मविआची उत्कृष्ट कामगिरी

माहितीच्या अधिकारात (RTI) मिळालेल्या माहितीत मविआची कामगिरी उत्कृष्ठ होती हे स्पष्ट दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या 30 महिन्यांच्या काळात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात राज्यात 18 लाख 68 हजार 055 नवीन सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) स्थापन झाले. हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या पाच वर्षांच्या स्थापन झालेल्या 14 लाख 16 हजार 224 पेक्षा साडे चार लाखांच्या संख्येने जास्त आहेत.

मविआच्या काळात एवढ्या नोकऱ्यांची निर्मिती

रोजगाराच्या आघाडीवरही मविआ सरकारच्या 30 महिन्यांच्या काळात 88 लाख 47 हजार 905 नोकऱ्या निर्माण झाल्या. हे प्रमाणही फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील नोकऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे.

नवीन रोजगाराच्या संधी

मविआ सरकार पाडल्यानंतर नवीन उद्योगांची संख्या 8 लाख 94 हजार 674 वरून 7 लाख 34 हजार 956 वर घसरली आणि नवीन रोजगाराच्या संधी देखील 42 लाख 36 हजार 436 वरून 24 लाख 94 हजार 691 एवढी कमी झाली.

मविआ सत्तेवर आल्यानंतर आर्थिक प्रगतीचा वेगही वाढला

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आर्थिक प्रगतीचा वेगही वाढला होता. 71 लाख 01 हजार 067 रुपयांच्या एकूण गुंतवणुकीसह 7 लाख 04 हजार 171 व्यवसायांनी 30 लाख 26 हजार 406 नवीन नोकऱ्या (2019-2020) निर्माण केल्या.

म्हणजेच पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ सत्तेवर असणा-या फडणवीस सरकारपेक्षा महाविकास आघाडीच्या अवघ्या 30 महिन्यांच्या कार्यकाळात राज्यात 4 लाख 51 हजार 831 जास्तीचे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) राज्यात सुरु झाले. त्यातून 26 लाख 11 हजार 027 नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या.

माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार जेव्हा कोरोना महामारी शिगेला पोहोचली होती तेव्हा राज्यात 6 लाख 21 हजार 296 नवीन उद्योगांची नोंदणी झाली होती ज्यामध्यमातून 44 लाख 60 हजार 149 रोजगार निर्मिती झाली.

महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातील दोन वर्ष कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यात गेली. या काळातच मविआचे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यपाल यांच्या मदतीने सरकारला अडचणीत आणण्याचे, बदनाम करण्याचे प्रयत्न सातत्याने प्रयत्न केले. केंद्रातील मोदी सरकारनेही मविआ सरकारला मदत केली नाही. विरोधी पक्षाचे सरकार म्हणून अडवणूक केली. या सर्व संकटाचा सामना करत मविआ सरकारने चांगली कामगिरी केल्याचे स्पष्ट होत आहे. बोलघेवड्या शिंदे फडणवीसांनी मविआ सरकार कितीही टीका केली तरी महाविकास आघाडीचे सरकारने यांच्या अनैतिक व असंविधानिक सरकारपेक्षा उत्तम कामगिरी केली हे स्पष्ट दिसत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: Nana patole criticism of shinde government they said maha vikas aghadi government is better on all fronts than talkative shinde fadnavis nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2023 | 04:30 PM

Topics:  

  • Maha Vikas Aghadi Government

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.