भंडाऱ्यात ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर 24 मजूर जखमी
नंदुरबारमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नंदुरबारमध्ये सहलीसाठी गेलेल्या पर्यटकांची बस दरीत कोसळून हा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी पर्यटकांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
हेदेखील वाचा- TRAI अधिकाऱ्याच्या नावाने केली ऑनलाईन फसवणूक; व्यवसायिकाला 90 लाखांचा गंडा
राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे पर्यटक धबधबे आणि धरणांच्या ठिकाणी पाण्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळ आहेत. जसं की, ज्ञानगंगा अभयारण्य, निनाई धबधबा, तोरणमाळ हिल स्टेशन, केदारेश्वर मंदिर, नारायणपूर, दक्षिण काशी मंदिर, दुबकेश्वर महादेव मंदिर, मांडवगड किल्ला, दंडपाणेश्वर गणेश मंदिर, गावदेवी मंदिर, तोरणमाळ वन्यजीव अभयारण्य, सनसेट पॉइंट, प्रकाशा, निष्कर्ष, माणिकडोह धरण आणि तोरणा देवी मंदिर. या पर्यटस्थळांवर पर्यटकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते.
हेदेखील वाचा- काय आहे जपानचे डायसुगी तंत्रज्ञान? ज्यामध्ये झाडांवरच उगवतात नवी झाडं!
या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक नंदुरबारमध्ये येतात. पण या गर्दीच्या ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडत असल्याचं समोर येत आहे. अशीच एक घटना नंदुरबारमध्ये देखील घडली आहे. नंदुरबारमध्ये पर्यटनस्थळी गेलेल्या पर्यटकांच्या बसचा दरीत कोसळून अपघात झाल्याचं समोर आलं आहे. वळंबा चिखली येथील एका घाटात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी पर्यटकांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अपघाताचा एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. पावसाळ्यातील निसरड्या रस्त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अक्कलकुवा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
नाशिकमध्ये देखील पर्यटकांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणावर पर्यटनासाठी आलेल्या 2 गाड्यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाल्याचं सोमर आलं आहे. या अपघातात 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रविवारी हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई आणि पुण्यातून हे पर्यटक नाशिकच्या भावली धरणावर आले होते. ते परतीच्या प्रवासासाठी निघाले असता हा भीषण अपघात झाला.