लोक झाडे तोडतात आणि त्यांच्या लाकडाचा वापर घरे, फर्निचर आणि इतर अनेक गोष्टीसाठी करतात. झाडे तोडण्याचा वेग वाढला असून, हे ग्लोबल वॉर्मिंगचे सर्वात मोठे कारण आहे. अशा परिस्थितीत जपानकडे आदर्श म्हणून पाहिलं जाऊ शकतं. येथे लाकडासाठी झाडे तोडली जात नाहीत.
फोटो सौजन्य - X account (Wrath Of Gnon)
झाडं वाचवण्यासाठी जपानमध्ये डायसुगी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या तंत्राद्वारे झाडाला न तोडता लाकूड काढलं जातं.
लाकडासाठी एखाद झाडं तोडलं तर ते सुकतं किंवा मरतं. यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं. वायू प्रदूषण आणि उकाड्यामुळे आधीचं लोकांचं जगणं कठीण होतं आहे.
या सर्व परिस्थितीवर उपाय म्हणून जपानमध्ये डायसुगी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान 600 वर्षे जुने आहे. म्हणजे हे तंत्रज्ञान 14-15 व्या शतकाच्या सुमारास सुरु झालं असावं.
डायसुगी तंत्रात, झाडाचे खोड सुमारे 1 मीटर उंचीवर कापले जाते. त्या झाडाच्या बुंध्यातून नवीन फांद्या निघू लागतात, ज्या वाढू देतात. यानंतर, त्या फांद्या देखील 50 सेमी उंचीवर कापल्या जातात. यातील केवळ कमकुवत फांद्या कापल्या जातात आणि फक्त मजबूत फांद्या वाढतात.
जपानमध्ये अशा प्रकारे हळूहळू झाडांच्या वर जंगल तयार होते. ज्याची काही काळ काळजी घेतली जाते. अशाप्रकारे झाडापासून लाकूड तोडले जाते आणि त्याचे कोणतेही नुकसान होत नाही.
जपानचे डायसुगी तंत्रज्ञान झाडे वाचवण्यास मदत करते आणि लाकडाची मानवी गरज देखील पूर्ण करते.