Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंहस्थ कुंभमेळाच्या कामात गिरीश महाजन यांचा 70000000000 रुपयांचा भ्रष्टाचार; रोहित पवारांचा गंभीर आरोप

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुंभमेळा आयुक्तांना मी माहिती मिळण्यासाठी अधिकृत पत्र दिले आहे. पण गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे, की रोहित पवारांना माहिती द्यायची नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 06, 2026 | 03:18 PM
सिंहस्थ कुंभमेळाच्या कामात गिरीश महाजन यांचा 70000000000 रुपयांचा भ्रष्टाचार; रोहित पवारांचा गंभीर आरोप

सिंहस्थ कुंभमेळाच्या कामात गिरीश महाजन यांचा 70000000000 रुपयांचा भ्रष्टाचार; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:
  • सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांवरून नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापले
  • आमदार रोहित पवार यांची पत्रकार परिषद
  • ३५ हजार कोटींच्या विकासकामांवरून प्रश्नचिन्ह
  • मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा रोहित पवारांचा आरोप
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडताच विकासकामांवरून चांगलेच राजकारण तापू लागले आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ३५ हजार कोटींची विकासकामे व धर्माच्या नावाखाली नाशिकमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच एकट्या पालकमंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी सात ते आठ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पवार यांनी यावेळी केल्याने शहरात राजकीय वातावरण तापले असून, दिवाळीपूर्वीच बॉम्ब फुटण्यास सुरुवात झाली आहे.

यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले, २०१५ मध्ये नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटी इतका खर्च झाला होता. तसेच २०१७ मध्ये उज्जैन कुंभमेळ्यासाठी ३१८३ कोटी, २०१९ मध्ये प्रयागराजसाठी ४२०० कोटी, आणि २०२५ मधील प्रयागराज कुंभमेळ्यासाठी सुमारे ७५०० कोटी खर्च आला होता. या तुलनेत नाशिकसाठीचा ३५००० कोटींचा खर्च अवास्तव असून, यातून ७ ते ८ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे.

नाशिकमध्ये फिरले तर ३५ हजार कोटींची कामे कुठे आहेत हेच दिसत नाही. जी कामे आणि रस्ते चांगले होते, तेच रस्ते मुद्दाम उखडून पुन्हा टेंडर काढले जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि खड्यांमुळे या पावसाळ्यात पंधरा ते सोळा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही विकास कामे आहेत की मृत्यूचे सापळे ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

महाजनांचा सिंहस्थ कामात 7 हजार कोटींचा भ्रष्टाचार

नाशिकमध्ये कामे झाली पाहिजेत, ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. आम्हीही मंदिरात जातो, पण आम्ही धर्माच्या व देव-देवतांच्या नावावर राजकारण करत नाही. भारतीय जनता पार्टी धर्माच्या नावावर जर भ्रष्टाचाराचा खडा टाकत असेल तर तो आम्हाला कदापि मान्य करणार नाही, असे सांगत पवारांनी लवकरच पुराव्यांसह मोठा गौप्यस्फोट करणार असा इशारा त्यांनी दिला आहे.

अधिकाऱ्यांचे कारनामे बाहेर काढणार

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुंभमेळा आयुक्तांना मी माहिती मिळण्यासाठी अधिकृत पत्र दिले आहे. पण गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे, की रोहित पवारांना माहिती द्यायची नाही. मी १० दिवसांची मुदत देतो, अन्यथा तुमचे कारनामे, बेनामी संपत्तीचे पुरावे मी बाहेर काढेल. सीएसआर फंडातून नाशिकमध्ये जी झाडे लावली होती, तीच झाडे तोडण्यात आली आणि ज्या अधिकाऱ्याने ती तोडली, त्यानेच तिथे स्वतःचे हॉटेल टाकले. हा पैसा आला कुठून? याची चौकशी झाली पाहिजे.

FAQ

1. रोहित पवार यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबाबत काय आरोप केला?
आमदार रोहित पवार यांनी नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी प्रस्तावित ३५ हजार कोटी रुपयांच्या खर्चात मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला.

2. गिरीश महाजन यांच्यावर किती रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला?
रोहित पवार यांनी पालकमंत्री गिरीश महाजन आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर सात ते आठ हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला.

3. रोहित पवार यांनी हा आरोप कधी केला?
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले.

Web Title: Girish mahajan involved in corruption worth 70 billion rupees in simhastha kumbh mela works says rohit pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 03:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.