Nashik News : नाशिकमध्ये महापालिकेच्या रुग्णालयाची दुराव्यस्था; फाटलेल्या गाद्या अन् वॉर्डात मांजरांच्या मुक्तसंचाराने रुग्ण भयभीत

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील महिला वॉर्डाच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. फाटलेल्या गाद्या, गंजलेले बेड आणि वॉर्डात मांजरींचा वावर असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असून, कुंभमेळ्यापूर्वी सुविधा सुधारण्याची मागणी होत आहे.
nashik-dr-zakir-hussain-hospital-.jpg
नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील अस्वच्छता आणि दुरावस्था (फोटो - AI)
Published on: 
Updated on: 
  • नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील महिला वॉर्डाच्या दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

  • फाटलेल्या गाद्या, गंजलेले बेड आणि वॉर्डात मांजरींचा वावर

  • कुंभमेळ्यापूर्वी सुविधा सुधारण्याची मागणी

खान नजमुल इस्लाम : नाशिक :  जुने नाशिक, मनपाच्या जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला वार्डात फाटलेल्या गाद्या, गंजलेले बेड, वार्डात मोकाट फिरणाऱ्या मांजरी तसेच महिला आणि लहान मुलांना एकाच वार्डात दाखल केले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, कुंभमेळ्यापूर्वी या परिस्थितीत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

महिला वार्डातील अनेक बेडच्या गाद्या पूर्णपणे फाटलेल्या असून, त्यातील फोम बाहेर आला आहे. बेडलाही गंज लागल्याचे निदर्शनास आले आहे. या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वैद्यकीय निवासी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज देण्यात आला होता. मात्र, अनेक दिवस उलटूनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

रुग्णालयातील वार्डात मांजरी मोकाट फिरत असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. औषधांच्या ट्रॉलीवर, औषधांच्या पेट्यांजवळ तसेच रुग्णांच्या बेडशेजारी मांजरी फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारे प्राण्यांचा वावर असणे आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने चिंताजनक असून, रुग्णांना संसर्गाचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महिला वार्डातच लहान मुलांना उपचारासाठी दाखल केले जात असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

पुण्यानंतर नाशिकच्या महापालिकेचा फ्लेक्स लावणाऱ्यांना दणका! होर्डिंग्जवरील दादा, भाऊ, साहेब रस्त्यावर

'या' आहेत प्रमुख मागण्या

महिला वार्डातील सर्व फाटलेल्या व खराब गाद्या बदलून नव्या वॉटरप्रूफ गाद्या बसवाव्यात, वार्डात मांजरी किया अन्य प्राणी प्रवेश करणार नाहीत, यासाठी खिडक्या व दरवाजांना संरक्षक जाळ्या बसवाव्यात, लहान मुलांसाठी स्वतंत्र बालरोग वार्ड सुरू करावा.

गोदाघाटावर नेमकं काय सापडलं? पुरातन मंदिराचे अवशेष मिळताच खोदकाम थांबवले

महिला वार्डात लहान मुलांना दाखल करू नये, रुग्णालयातील परिस्थितीची वरिष्ठ अधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने सुधारणा करावी, कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण करण्याची चर्चा सुरू असताना, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील मूलभूत सुविधांची दुरवस्था दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते याहीया रशीद पठाण यांनी केली आहे.

Q

नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील कोणत्या समस्या समोर आल्या आहेत?

A

महिला वॉर्डातील फाटलेल्या गाद्या, गंजलेले बेड, मांजरींचा मुक्त वावर आणि अपुऱ्या सुविधांबाबत तक्रारी समोर आल्या आहेत.

Q

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील महिला वॉर्डाबाबत कोणत्या मागण्या करण्यात आल्या आहेत?

A

खराब गाद्या बदलून वॉटरप्रूफ गाद्या बसवाव्यात, खिडक्या व दरवाजांना संरक्षक जाळ्या लावाव्यात आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बालरोग वॉर्ड सुरू करावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

Q

नाशिकच्या रुग्णालयातील सुविधांमध्ये सुधारणा करण्याची मागणी कोणी केली आहे?

A

सामाजिक कार्यकर्ते याहीया रशीद पठाण यांनी महापालिका प्रशासनाकडे रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून मूलभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.

clear this image use