

नाशिकमध्ये रिंगरोडच्या भूसंपादनस सुरुवात
रिंगरोडबाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
पालकमंत्र्यांची मुंबईत होणार बैठक
Nashik Ring road : नाशिक : रिंगरोडबाधित शेतकऱ्यांनी शनिवारी (दि. २८) दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडल्यानंतर प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार सक्तीच्या भूसंपादनाला ८ ते १० दिवसांची स्थगिती दिली. तसेच गवळवाडी मार्गाचे फेरसर्वेक्षण आणि मखमलाबाद मार्गाच्या अलाइनमेंटमध्ये बदल करण्याबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन दिले.
रिंगरोडबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, पालकमंत्री उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी शेतकऱ्यांनी चुकीची अलाइनमेंट, अपुरा मोबदला, घाईघाईने जाहीर केलेले भूसंपादन निवाडे आणि पोलिस बळाच्या वापरावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार गोकुळ गीते यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, बुधवारी एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत शेतकरी प्रतिनिधींची बैठक होणार असून, पर्यायी मार्ग आणि नवीन अलाइनमेंटबाबत चर्चा केली जाणार आहे.
मंगळवारी मुंबईत पालकमंत्र्यांसोबत बैठक
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबई येथे शेतकरी प्रतिनिधीसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. रिंग रोड बाधीतांच्या प्रलचित प्रश्नांवर तोडगा काढण्याचे या बैठकीत प्रयत्न केले जाणार आहे. तसेच जिरायतीवरून बागायती झालेल्या जमिनीना वाढीव गुणांक आणि योग्य मोबदला मिळाला आहे की नाही, याचा एकत्रित अहवाल भूसंपादन अधिकाऱ्यांकडून मागविण्यात येणार असून सोमवारी शेतकरी प्रतिनिधींसमोर सादर केला जाणार आहे.
गोदाघाटावरील अवशेषांची पुरातत्व विभागाकडून पाहणी; ऐतिहासिक नोंदीतून उलगडला इतिहास
छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी इशारा दिला की, "बुधवारपर्यंत आश्वासनाची ठोस रौकोसह तीव्र जनआदोलन छेडण्यात येईल, विकासाला विरोध नसून शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी, फळबागा आणि उदरनिर्वाहाची साधने वाचविण्यासाठी न्याय मिळेपर्यंत लढा सुरूव राहील," असे त्यांनी स्पष्ट केले.
'रोहित पवारांना PAने वैगरे कुणीतरी हे पत्र लिहून दिलं असेल...', अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया
रिंगरोडसाठी जमिनींचा ताबा घेण्यास सुरुवात
सिंहस्थ कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराभोवती उभारण्यात व्येणाऱ्या परिक्रमा मार्ग अर्थात रिंगरोड प्रकल्पाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. या प्रकल्पासाठी संपादित जमिनींचा प्रत्यक्ष ताबा येऊन त्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) हस्तांतरित करण्याचे आदेश अपर तहसीलदार कार्यालयाने दिले आहेत.
त्यानुसार ३० नोव्हेंबरला पिंपळगाव बहुला, १ डिसेंबरला पाथर्डी तर आणि ३ डिसेंबरला पंचक येथे ताबा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अपर तहसीलदार अमोल निकम यांनी व्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ताबा प्रक्रियेसाठी संबंधित मंडल अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांना संयुक्तपणे प्राधिकृत करण्यात आले आहे. ताबा घेताना गटनिहाय पंचनामा करून ताबा पावती देण्यात येईल. मोजणी नकाशे आणि आवश्यक कागदपत्रांसह जमीन एमएसआयडीसीच्या अधिकृत प्रतिनिधीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार असून, पोलिसांना आवश्यक बंदोबस्तासह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सिंहस्थ काळात कोट्यवधी भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, जड वाहनांना बाह्य मागनेि वळविण्यासाठी आणि भाविकांची वाहतूक सुकर करण्यासाठी रिंगरोड महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे जमिनीचा ताबा घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणे, हा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे