नाशिक : रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी हुक्का पार्टीवर छापा टाकत रेवती कंपनीच्या हार्डवेअर स्पेअरपार्ट कंपनीतील देशातील प्रत्येक राज्यातील होलसेल डिस्ट्रीब्यूटर असलेले ते ५३ तरुण व देहविक्री करणार्या १८ तरुणीसह २ महिलांना पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाने माऊंटन शॉडो रिसॉर्टमध्ये छापा मारून रंगेहाथ हुक्कापार्टी करतांना पकडले होते. या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार कायदा व सिगारेट तंबाखू मुंबई प्रोविजन अॅक्ट या कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या सर्व संशयित आरोपींना इगतपुरी पोलीसांनी सोमवारी दुपारी तीन वाजता इगतपुरी न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील व संशयित आरोपींच्या वकील यांच्यामध्ये सायंकाळी ऊशीरा पर्यंत युक्तीवाद झाला. यावेळी यावेळी सरकारी वकिलांनी तीन दिवसांची पोलीस कस्टडी मागितली होती. मात्र यामध्ये ज्या महिला अनैतिक व्यापार कायद्यामध्ये ते आरोप होऊ शकत नाही त्या पीडित असतात असे कोर्टाने ग्राह्य धरल्याने यामध्ये सतरा-अठरा मुलींना हा कायदा लागू झाला नाही. सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हा कायदा जामीनपात्र असल्यामुळे हे गृहीत धरून तसेच दारू प्रतिबंधक केस यामध्ये पोलिस कस्टडीची गरज नाही असा युक्तीवाद संशयित आरोपींचे वकील अँड. राहुल कासलीवाल, सचिन भाटी, नदीम मेमन, विलास पाटील, संदेश देशमुख आदी वकिलांनी सरकारी वकीलाशी युक्ती वाद केला.
[read_also content=”रशिया-युक्रेन युद्ध लांबल्यास जागतिक अन्न सुरक्षा धोक्यात येणार, IMF चा अहवाल https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/prolonged-russia-ukraine-war-could-threaten-global-food-security-imf-report-nrps-255091.html”]
यानंतर इगतपुरी न्यायालयाने ५३ तरुण १८ तरुणी या संशयितांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली तर शिल्पा सिराज कुरेशी व दीपाली देवळेकर या दोन महिलांना १६ मार्चपर्यंत महिला पुरवण्याचा आरोपांमध्ये चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनवण्यात आली असल्याची माहिती सरकारी वकील अँड. अर्चना महाले यांनी दिली. बाकी १८ महिलांना कलम 15 प्रमाणे वात्सल्य होम प्रोटेक्शन ठेवण्याचा आदेश केला आहे. या तरूणींचे नातेवाईक आल्यावर त्यांच्या ताब्यात कस्टडी दिली जाईल असे सांगितले. तसेच उरलेल्या संशयित आरोपीचे जामीन अर्ज उद्या न्यायालयात दाखल करण्यात येणार असून उद्या त्यांना जामीन मिळेल असे खासगी वकिलांकडून सांगण्यात आले.
[read_also content=”कोरोना महामारीनंतर नवा ट्रेंड : सगळीकडेच शिक्षण संकटात, लाखो शिक्षक सोडतायेत नोकऱ्या, रियल इस्टेट एजंट, सेल्स पर्सन, सॉफ्टवेअर इंजिनिअर होण्याचा प्रयत्न https://www.navarashtra.com/world/new-trend-after-corona-pandemic-education-everywhere-in-crisis-lakhs-of-teachers-are-leaving-jobs-real-estate-agents-sales-persons-software-engineers-trying-to-become-nrab-255103.html”]