अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना रविवारी लिलावती रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर येताच नवनीत यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका करताना त्यांना अप्रत्यक्षपणे पोपट असे संबोधले(Navneet Rana will lodge a complaint against Sanjay Raut with Modi, Shah).
ज्या पद्धतीने पोपटाने नागपूरच्या पत्रकार परिषदेत 20 फूट खोल खड्ड्यात गाडू असे म्हटले होते. येणाऱ्या काळात मुंबई आणि महाराष्ट्राची जनताच त्यांना खड्ड्यात टाकणार यात दुमत नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी दिल्लीला जाणार असून त्यांच्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांकडे तक्रार करणार असल्याचे नवनीत म्हणाल्या.
न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्याचे आम्ही पालन करू. राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितल्यानंतरही त्यावर आक्षेप घेण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत चवन्नीछाप आहेत. ते कोर्टाच्या निर्णयावरही टीका करतात असे आमदार रवि राणा म्हणाले.
[read_also content=”IGCAR च्या शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा! चीन, अमेरिका सगळे पाया पडतील; भारताला हवं तसं जग चाले https://www.navarashtra.com/india/india-will-be-a-superpower-shocking-revelation-of-igcar-scientists-nrvk-276095.html”]
[read_also content=”OK म्हंटल्या शिवाय वाक्याचा शेवटचं होत नाही; OK शब्दामागची मनोरंजक हिस्ट्री आणि त्याचा फुल फॉर्म https://www.navarashtra.com/viral/interesting-history-behind-the-word-ok-and-that-full-form-276239.html”]
[read_also content=”कोणी गिफ्ट म्हणून किंवा फुकट दिल्या तरी अजिबात घेऊ नका या वस्तू; नाहीतर तुमच्या मागे अशी ईडा-पिडा लागेल की… https://www.navarashtra.com/lifestyle/jyotish-tips-for-good-life-nrvk-276206.html”]
[read_also content=”मुंबईत रेल्वे पुलाखाली अडकला कंटेनर; ड्राहव्हरने असं डोक लावलं की पोलिसही शॉक झाले https://www.navarashtra.com/latest-news/container-stuck-under-railway-bridge-in-mumbai-nrvk-276226.html”]