Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर, विधान परिषदेत खडाजंगी, अंबादास दानवेंची दानवेंचा तीव्र विरोध

  • By युवराज भगत
Updated On: Dec 07, 2023 | 03:35 PM
अखेर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर, विधान परिषदेत खडाजंगी, अंबादास दानवेंची दानवेंचा तीव्र विरोध
Follow Us
Close
Follow Us:

Nagpur Winter Session 2023 Updates : महाराष्ट्रातील दुसरी आर्थिक राजधानी असलेल्या नागपूर येथे विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशा वेळी नुकतेच, जामिनावर सुटलेले नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली आहे. परंतु, सत्ताधारी पक्षाबरोबर बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जेलमध्ये असताना ते राष्ट्रवादी पक्षाचे मंत्री होते, त्याचबरोबर ते राष्ट्रवादीचे प्रमुख प्रवक्तेसुद्धा होते. ते जेलमध्ये असतानासुद्धा त्यांना मंत्रिपदावरून न काढण्याची भूमिका राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी घेतली होती. सत्ताधारी पक्षासोबत बसल्याने त्यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे.

उत्तर द्या सुपर सीएम!

ज्यांच्यावर आपण आरोपांच्या फैरी झाडल्या, दाऊदशी व्यवहार केल्याचे सांगत जेलात धाडले, आज तेच आपल्याला इतके प्रिय कसे झाले? की ते 'नवाबी थाटात' मांडीला मांडी लावून बसताना तुम्हाला 'आपले' वाटायला लागले आहेत? तुमच्या बाजूने बसले म्हणून ते आता 'ओके' आहेत की हा…

— Ambadas Danve (@iambadasdanve) December 7, 2023

विधान परिषदेत गोंधळ

दाऊदशी संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्याशी गोवावाला कपाऊंडच्या जमीन व्यवहारात अपहार केल्याचा आरोप असलेले नवाब मलिक सध्या जामिनावर आहेत. ते तुरुंगात असताना राष्ट्रवादीत बंडखोरी झाली. त्यामुळे नवाब मलिकांची भूमिका स्पष्ट झाली नव्हती. अखेर, ते आज विधानसभेत सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्याने ते अजित पवार गटात असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरून विधान परिषदेत गोंधळ झाला.

सरकारला घेरण्याचा प्रयत्न

ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी नवाब मलिका यांच्यावरील आरोपांवरून त्यांचं नाव न घेता सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिप्रश्न उपस्थित केले. आजपासून (७ डिसेंबर) विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. पहिल्याच दिवशी या मुद्द्यावरून विधान परिषदेत खडाजंगी पाहायला मिळाली.

अंबादास दानवे आपल्या प्रश्नावर ठाम

अंबादास म्हणाले, “खालच्या सभागृहात एक सदस्य बसले आहेत, ज्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने अशी भूमिका घेत होते की आम्ही देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. त्यांच्याविरोधात काय गुन्हे होते, हे माहित आहे.” अंबादास दानवेंनी हा प्रश्न उपस्थित करताच सभागृहात गोंधळ सुरू झाला. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही हा प्रश्न उद्या उपस्थित करण्याची विनंती केली. परंतु, अंबादास दानवे आपल्या प्रश्नावर ठाम राहिले.

सरकारची भूमिका काय

यावर अंबादास दानवे म्हणाले, “एक सभासद सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसले आहेत. त्यांच्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलं की एका देशद्रोह्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. उघड उघड दाऊद इब्राहिमची वेगवेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार जाहीर केले. त्यामुळे याबाबत सरकारची भूमिका काय हे कळलं पाहिजे.”

त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर द्या

अंबादास दानवे यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की जेलमध्ये व्यक्ती असतानाही आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही. ते आता ही भूमिका मांडत आहेत. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. आमच्या बाजूला अजित दादा मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या बाजूला, भुजबळ बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. देशद्रोह्याचा आरोप झाल्यानतंर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर द्या आणि मग आम्हाला प्रश्न विचारा.

Web Title: Nawab malik on ruling bench fadnavis sharp reply to accusation of sedition in legislative council strong opposition of ambadas and demons nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2023 | 02:34 PM

Topics:  

  • nawab malik

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.