Manikrao Kokate Video: "दादांनी 'माणिक' नाहीतर 'सागरगोटा'..."; शरद पवार गटाची रमी प्रकरणावरून कोकाटेंवर सडकून टीका
Maharashtra Politics: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात ऑनलाईन रमी खेळताणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी देखील माणिकराव कोकाटे हे आपल्या विधानांमुळे कायमच चर्चेत आले आहेत. मी रमी खेळात नव्हतो तर, जाहिरात स्किप करत होतो असे, स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिले आहे. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन व्हिडीओ आणखी पोस्ट केले. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. चारोळी लिहून त्यांनी कोकाटे यांच्यावर टीका केली आहे.
ऑनलाईन र्मी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यावर राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर आपली बाजू मांडली आहे. मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येत नाही. मी फोन सुरू केला आणि त्यावर गेम सुरू झाला. फोन नवीनच असल्यामुळे मला तो गेम स्किप करता आला नाही. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या व्हिडीओ चित्रीत केला आणि अधिवेशन संपल्यावर व्हायरल केला. नाही. आजतागायत मी राम्मी खेळलो नाही तरी माझी बदनामी केली जात आहे. ज्या नेत्यांनी बदनामी केली त्या सर्वांना मी कोर्टात खेचणार आहे.
राजीनामा देण्यासारखे घडलं काय? मी काही विनयभंग केला का ? माझी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे का? मी मुख्यमंत्री यांना ब्रिफ केलेलं नाही. चौकशी झाली नाही त्यामुळे समज होणे साहजिकच आहे. रम्मी खेळलो नाही आणि खेळत नाही. मला नियमांची काळजी आहे. हा विषय अनावश्यक लावून धरले आहे. मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत, असं यावेळी कोकाटेंनी सांगितले.
शरद पवार गटाने केली टीका
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर चारोळी करत सडकून टीका केली आहे. त्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे ते , जाणून घेऊयात.
दादांनी 'माणिक' नाही,
शोधलाय 'सागरगोटा'..
त्यामुळे बळीराज्याचा झालाय मोठा 'तोटा'
ओसाडगावच्या पाटलांनी जुगारातून केला पैसा 'मोठा'..! pic.twitter.com/gm1BZ4ZKxK— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) July 22, 2025
दादांनी ‘माणिक’ नाही,
शोधलाय ‘सागरगोटा’..
त्यामुळे बळीराज्याचा झालाय मोठा ‘तोटा’
ओसाडगावच्या पाटलांनी जुगारातून केला पैसा ‘मोठा’..!
मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली नाराजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर होते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शासन भिकारी आहे शेतकरी नाही या विधानावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “कोकाटे नेमके काय म्हणाले ते मी ऐकलेलं नाही. तथापि त्यांनी असं विधान केले असेल तर एखाद्या मंत्र्याने असे विधान करणे चुकीचे आहे. पीकविमा पद्धत बदलण्याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घेतलेला आहे.