Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांचा कचऱ्याचा प्रश्न आता मिटणार; रात्रपाळीतही उचलला जाणार कचरा

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांकडून महापालिका प्रशासनाबरोबर आढावा बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांमध्ये कचरा साठणे, उघड्या जागेवरील कचरा अशा विविध प्रकारच्या तक्रारी केल्या गेल्या आहेत

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 15, 2025 | 10:41 AM
पुणेकरांचा कचऱ्याचा प्रश्न मिटणार; आता रात्रपाळीतही उचलला जाणार कचरा

पुणेकरांचा कचऱ्याचा प्रश्न मिटणार; आता रात्रपाळीतही उचलला जाणार कचरा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणेकरांच्या कचऱ्याविषयी सातत्याने तक्रारी वाढू लागल्या आहेत. या तक्रारींवर मार्ग काढण्यासाठी आता रात्रपाळीतही कचरा उचलण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणीही लवकरच केली जाईल, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.

हेदेखील वाचा : ऐतिहासिक ‘शिंदे छत्री’ परिसरात निवासी क्षेत्र करण्याची सिंधीया ट्रस्टची मागणी; महानगरपालिकेची भूमिका काय?

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांकडून महापालिका प्रशासनाबरोबर आढावा बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांमध्ये कचरा साठणे, उघड्या जागेवरील कचरा अशा विविध प्रकारच्या तक्रारी केल्या गेल्या आहेत. यापूर्वी देखील महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी तक्रारींची दखल घेत, घनकचरा विभागाला आदेश दिले होते. उघड्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक अस्वच्छता करणे, बांधकामाचा राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे.

एकीकडे कारवाई सुरु असताना, महापालिकेकडून कचरा गोळा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता दिवसाप्रमाणेच रात्रीच्यावेळी देखील कचरा गोळा केला जाणार आहे. नुकतेच महापालिकेच्या ताफ्यात 81 गाड्या (छोटा हत्ती) सामिल झाल्या आहेत. यापूर्वी ताफ्यात 270 गाड्या असून, या गाड्यांची संख्या साडे तीनशेच्या पुढे गेली आहे.

दुकानदारांकडून कचरा टाकला जातो उघड्यावर

शहरात अनेक ठिकाणी, भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक, खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून रात्रीच्या वेळी दुकान बंद केल्यानंतर तेथेच कचरा टाकला जातो. हा उघड्यावर पडणारा कचरा आणि नागरिकांकडून टाकला जाणारा कचरा रात्रीच उचलण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक वाहन चालक, बिगारी आदी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरु केली जाईल, अशी देखील माहिती देण्यात आली आहे.

शहरात हजारो मेट्रिक टन कचरा होतो गोळा

शहरात प्रतीदिन 2 हजार ते 2 हजार 200 मेट्रिक टन एवढा कचरा निर्माण होतो. सणाच्या कालावधीत कचरा निर्माण होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढते. स्वच्छ संस्थेबरोबर करार गरजेचे असल्याची माहिती आहे. तसे न झाल्यास शहरात कचर्‍याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. करार संपुष्टात आल्यानंतरही सध्या स्वच्छ सेवकांकडून कचरा संकलन केले जात आहे. मात्र, करार लांबणीवर पडल्याने आणि अल्पकाळासाठी सातत्याने मुदतवाढ देण्यात येत असल्याने स्वच्छ कर्मचार्‍यांमध्येही नाराजीचा सूर देखील यापूर्वी पाहिला मिळाला होता.

हेदेखील वाचा : Pune News: शिक्षण संस्थांची गळचेपी सुरू असताना सरकार गप्प का? ‘या’ प्रकरणात राजीव गांधी स्मारक समिती आक्रमक

Web Title: Now garbage will be collected even during the night shift nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • Garbage Issue
  • Pune Municipal Corporation

संबंधित बातम्या

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 
1

Pune Election News: रस्ते नाहीत, पाणी नाही,  मतदान नाही;  वाघोलीतील नागरिकांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार 

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार;  १४ ते १५ बदलांची चर्चा
2

Pune Ward structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचना लवकरच जाहीर होणार; १४ ते १५ बदलांची चर्चा

प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता पूर्ण; आता बदलाकडे लागले सर्वांचे लक्ष
3

प्रभाग रचनेच्या आराखड्यावरील सुनावणींची औपचारिकता पूर्ण; आता बदलाकडे लागले सर्वांचे लक्ष

Mutha River Revitalization Project: पुणेकरांची पुराची समस्या संपणार! काय आहे पुणे महापालिकेचा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प?
4

Mutha River Revitalization Project: पुणेकरांची पुराची समस्या संपणार! काय आहे पुणे महापालिकेचा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.