Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता पोषण आहाराचे होणार ऑडिट; सनदी लेखापाल संस्थेचीही होणार नियुक्ती

शाळांनी माहिती भरताना शाळेकडील उपलब्ध सर्व अभिलेखांचा आधार घेऊन योग्य, अचूक व वस्तुनिष्ठ माहिती भरावी. माहिती शाळांनी केवळ एकदाच भरायची आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 31, 2024 | 09:05 AM
आता पोषण आहाराचे होणार ऑडिट

आता पोषण आहाराचे होणार ऑडिट

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना शालेय पोषण आहारासाठी अनुदान दिले जाते. याच अनुदानाच्या माध्यमातून शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. यामध्ये अनेकवेळा अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात येतात. परंतु, ही योजना योग्य पद्धतीने सुरू आहे का, याची पाहणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने 2021 ते 2024 या काळातील शाळांच्या पोषण आहाराचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शहर, तालुका व जिल्हास्तरावर योजनेची अंमलबजावणी करताना 2021 ते 2024 या कालावधीत करण्यात आलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण करण्यासाठी पुण्यातील शिंदे, चव्हाण, गांधी अँड कंपनी या सनदी लेखापाल संस्थेची नियक्ती केली आहे. या संस्थेमार्फत राज्यातील योजनेस पात्र सर्व शाळांचे लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याने योजनेस पात्र शाळांना एका वेबफॉर्मद्वारे माहिती भरावी लागणार आहे.

लेखापरीक्षा होणार निशुल्क

शाळांनी माहिती भरताना शाळेकडील उपलब्ध सर्व अभिलेखांचा आधार घेऊन योग्य, अचूक व वस्तुनिष्ठ माहिती भरावी. माहिती शाळांनी केवळ एकदाच भरायची आहे. त्यामुळे माहिती भरताना योग्य ती दक्षता शाळाप्रमुख, मुख्याध्यापक यांनी घेणे आवश्यक आहे. शाळांनी माहिती भरल्यानंतर संस्थेमार्फत टप्प्याटप्प्याने विविध जिल्ह्यांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. तालुकानिहाय लेखापरीक्षणाचा कार्यक्रम जिल्ह्यांना कळविण्यात येणार आहे.

…तर शाळाप्रमुखांवर दंडात्मक कारवाई

लेखापरीक्षणासाठी शाळांकडून कोणत्याही स्वरूपाची फी घेण्यात येणार नाही. लेखापरीक्षणासाठी सर्व शाळांनी माहिती देणे अनिवार्य आहे. लेखापरीक्षणास माहिती सादर न करणाऱ्या शाळाप्रमुखांकडून दंडात्मक तसेच प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांचे लेखापरीक्षण होण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची राहील, असे देखील निर्देशात स्पष्ट केले आहे.

याची होणार तपासणी…

  • बँक पासबुक, कॅशबुकचा तपशील, तांदूळ साठा नोंदवही, इतर धान्य माल
  •  तांदूळ खर्च विवरण नोंदवही
  • शासन खाती भरणा केलेल्या रकमांच्या चलनांची प्रत
  • सर्व प्रकारच्या खर्चाचे व्हाऊचर्स, उपयोगिता प्रमाणपत्रे

Web Title: Now there will be an audit of nutrition scheme nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 09:05 AM

Topics:  

  • Maharashtra Government Scheme

संबंधित बातम्या

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान
1

‘राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थी महिलांवर…’; आदिती तटकरेंचं मोठं विधान

…तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता बाद; गडचिरोलीत 25 हजार महिला ठरल्या अपात्र
2

…तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता बाद; गडचिरोलीत 25 हजार महिला ठरल्या अपात्र

राज्याला बसतोय आर्थिक फटका; ‘आनंदाचा शिधा’नंतर आता ‘ही’ योजना अडचणीत
3

राज्याला बसतोय आर्थिक फटका; ‘आनंदाचा शिधा’नंतर आता ‘ही’ योजना अडचणीत

‘लाडकी बहीण’ योजनेचे भवितव्य अंधारात? महायुतीतूनच केला जातोय तीव्र विरोध
4

‘लाडकी बहीण’ योजनेचे भवितव्य अंधारात? महायुतीतूनच केला जातोय तीव्र विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.