निवडणुकीत उमेदवार उतरवण्याची घोषणा करताच नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर घणाघाती टीका केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघही ठरले आहेत. दरम्यान जरोगेंनी निवडणुकीस उमेदवार उतरण्याची घोषणा करताच, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या घणाघाती टीका केली आहे. जरांगें-पाटील बारामतीतून मॅनेज झाले आहेत, सर्व जागांवर उमेदवार उभे करणारे आता दोन तीन जागांवर आले आहेत. त्यामुळे तीन तारखेनंतर जरांगे पाटील इतिहास जमा होतील, अशी टीका त्यांनी केली आहे.
जरांगें मराठा समाजाच्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत. मात्र उद्या ४ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचे उमेदवार माघार घेतील असा दावा हाके यांनी केला आहे.
मनोज जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना ओबीसी समाज मतदान करणार नाही. एका जातीच्या आरक्षणासाठी आंदोलन करायचं नसतं. तर गोरगरीब आणि सामाजिकदृष्ट्या मागास राहिलेल्या समाजासाठी लढायचं असतं. जरांगेंनी लोकसभेआधी खेळ चालवला होता. त्यावेळी काहीही चाललं नाही. आता विधानसभेलाही आंदोलनाचं नाटक सुरू आहे. मात्र जरांगेंची पोळी भाजणार नाही.
हेही वाचा-Jharkhand Election 2024: NDA ची एकजूट; पण इंडिया आघाडीत तीन जागांवर होणार मैत्रीपूर्ण लढत
1३५ उमेदवार पाडणार, एकेकाला बघून घेऊ ही भाषा होती. लोकशाहीचे मूल्य काय आहे? एका मताला लाख मोलाची किंमत आहे. मुस्लीम आणि दलित समाजाच्या प्रमुखांशी चर्चा करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मनोज जरांगें पाटील करत आहेत. निवडणुका आल्या की मुस्लिम, दलित आठवतात का? तुम्ही ओबीसी घरं टार्गेट करता, आता हे महाराष्ट्राला समजून चुकलं आहे. निवडणूक एका जातीच्या आरक्षणावर लढली जात नाही.
मराठा समाजाचे लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात होत्या. मुस्लिम, दलित समाजाच्या मनात भीती निर्माण झाली होती. ज्यांनी त्यांना पैसे दिले, गाड्या दिले त्यांना ओबीसी समजा कधीही मतदान करणार नाही. जे उमेदवार जरांगेंना रात्री भेटले त्यांच्या विरोधात जरांगे उमेदवार देणार नाहीत. आमचा रोष ज्या-ज्या माणसांनी जरांगे यांना पाठिंबा दिला त्यांच्यावर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज जरांगेंनी बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. केज गेवराई आणि आष्टी मतदारसंघाबाबत स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.राजकारणाचा आपल्याला जास्त अनुभव नसल्यामुळे वेळ लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत अधिकृत घोँषणा करणार आहेत.