
शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थान अॅक्शन मोडवर ; निर्णयाची अंमलबजावणी उद्याच होणार
शिर्डी : देशभरातील लोकांच श्रद्धास्थान असलेलं शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर (Saibaba Mandir) हे आज साईभक्तांसाठी रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली. दसरा (Dasara) आणि पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने भविकांची होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यत आला आहे.
[read_also content=”मोठी कारवाई! काश्मीरमधील शोपियानमध्ये जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान https://www.navarashtra.com/india/big-action-3-jaish-e-mohammed-terrorists-killed-in-shopian-kashmir-nrrd-332807.html”]
शिर्डीत साईबाबांचा पुण्यतिथी उत्सव सुरू आहे. निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव सादरा करण्यात येत असल्याने साईभक्तांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने देश- विदेशातील लाखो भाविकांनी साईदर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी साईभक्तांची गर्दी बघता आज साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानाने घेण्यात आला आहे.