Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कणकवली पर्यटन महोत्सवानिमित्त नामवंत कलाकारांची हजेरी, रसिकांना विविध कार्यक्रमांची मिळणार मेजवानी!

कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 07, 2024 | 02:46 PM
कणकवली पर्यटन महोत्सवानिमित्त नामवंत कलाकारांची हजेरी, रसिकांना विविध कार्यक्रमांची मिळणार मेजवानी!
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली : यावर्षीचा कणकवली पर्यटन महोत्सव हा ११ जानेवारी ते १४ जानेवारी या कालावधीत होत आहे. या पर्यटन महोत्सवाचे ११ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ.नितेश राणे, माजी आ. प्रमोद जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर समारोप केंद्रीय मंत्री नारायण राणे, ना. गिरीश महाजन, युवा नेते निलेश राणे, आ.नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ जानेवारी रोजी होणार आहे. सलग चार दिवस या महोत्सवानिमित्त नामवंत कलाकार कणकवलीत हजेरी लावणार असून विविध कार्यक्रमांची कणकवलीकरांसाठी एक खास मेजवानीच लाभणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजा पाटकर, पंकज पेडणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

समीर नलावडे म्हणाले, ११ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी संगीत संध्या ‘रेट्रो टू मेट्रो’ व ‘फु बाई फु’ फेम कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे. शशांक कल्याणकर यांचा ऑर्केस्ट्रा व नामवंत ७ कलाकार असणार आहेत. फु बाई फु फेम सागर कारंडे, हेमांगी कवी यांची कॉमेडी पहायला मिळणार आहे. तर १२ जानेवारीला ‘आम्ही कणकवलीकर’ यांचा कणकवली व लगतच्या गावातील कलाकारांचा सुहास वरुणकर, प्रा.हरिभाऊ भिसे प्रस्तुत ३०० नामवंत कलाकारांसहित संगीत, नृत्य व कॉमेडी असा रंगतदार कनक संध्या कार्यक्रम व पदर प्रतिष्ठान महिलांचा कार्यक्रम होईल.

१३ जानेवारीला ८ वाजता इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे, आशिष कुलकर्णी, निहाल तौरो या नामवंत कलाकारांचा हिंदी – मराठी गाण्यांचा भव्य कार्यक्रम, तर १४ जानेवारीला या पर्यटन महोत्सवाचा ९ वाजता समारोप होईल. त्यानिमित्त प्लेबॅक सिंगर दिव्यकुमार, नचिकेत लेले, चेतना भारद्वाज व संचिता गर्गे यांचा ऑर्केस्ट्रा असणार आहे, कणकवलीकरांनी या कणकवली पर्यटन महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन समीर नलावडे यांनी केले आहे.

Web Title: On the occasion of the kankavali tourism festival the appearance of famous artists the fans will get a feast of various programs kankavali tourism festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2024 | 02:46 PM

Topics:  

  • indian idol

संबंधित बातम्या

Pawandeep Rajan: गंभीर अपघातानंतरही रुग्णालयात गाताना दिसला गायक; चाहते झाले भावुक, Viral Video
1

Pawandeep Rajan: गंभीर अपघातानंतरही रुग्णालयात गाताना दिसला गायक; चाहते झाले भावुक, Viral Video

आयसीयूमधून अखेर बाहेर आला Pawandeep Rajan, वेदनेतही आनंदी हसताना दिसला गायक!
2

आयसीयूमधून अखेर बाहेर आला Pawandeep Rajan, वेदनेतही आनंदी हसताना दिसला गायक!

Pawandeep Rajan ची प्रकृती खालावली? गायक आयसीयूमध्ये दाखल, तब्येतीबाबत टीमने दिले अपडेट!
3

Pawandeep Rajan ची प्रकृती खालावली? गायक आयसीयूमध्ये दाखल, तब्येतीबाबत टीमने दिले अपडेट!

मानसी घोष बनली ‘इंडियन आयडल १५’ ची विनर, चमकदार ट्रॉफीसह पटकावले ‘हे’ बक्षीस!
4

मानसी घोष बनली ‘इंडियन आयडल १५’ ची विनर, चमकदार ट्रॉफीसह पटकावले ‘हे’ बक्षीस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.