
Tarapur MIDC: In the election of 'Tima', D. Dominance of K. Raut group
पालघर : आशिया खंडात तारापूर एमआयडीसीची ओळख आहे. या औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (टिमा ) या संघटनेच्या व्यवस्थापकीय समिती पदासाठी (मॅनेजिंग कमिटीच्या) जनरल कॅटेगिरीच्या 11 सदस्यांकरिता आज घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये टिमाचे विद्यमान अध्यक्ष डि. के.राऊत गटाचे सर्वच्या सर्व 11 उमेदवार विजयी झाले(Tarapur MIDC: In the election of ‘TIMA’, D. Dominance of K. Raut group).
या निवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात होते त्या पैकी देवेश मेटल अँड केमिकल्सचे कृष्णा देशमुख यांचा पराभव पत्करावा लागला. तर सहा जणांची याअगोदरच बिनविरोध निवड झाली होती.
सन 2022 ते 2025 या कालावधीकरीता घेण्यात आलेल्या या निवडणुकीत 381 मतदारांपैकी 281 जणांनी मतदानाचा हक्क बजावला तर 1 मतपत्रिका बाद ठरवण्यात आली निवडणुकीत लार्ज स्केल मधून निलेश पाटील , पवन कुमार खेतान ,मिडीयम स्केल मधून रणबीर शर्मा , नीरज पुरोहित तर स्मॉल स्केल मधून उदयन(संदिप) सावे व एस. के. गुप्ता हे सहा जण अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत .
आजच्या जनरल कॅटेगिरीच्या निवडणूकित अँक्री ऑरगॅनिक या कारखान्याचे रवींद्रचंद्र भावसार यांना 239 मते मिळाली तर अँकर केमिकल्सचे वेलजी गोगरी( 244 मते), बी.आय. सी. केमिकल्स अँड पॅकेजिंगचे श्यामलाल शर्मा (237 मते), ब्रीज आईस मॅन्युफॅक्चरचे बीरेंद्रसिंग (पापा) ठाकूर ( 230 मते), कॉस्मिक केमिकल्सचे जगन्नाथ भंडारी ( 230 मते), इमील फार्मासिटिकलस इंडस्ट्रीचे राजेंद्र गोले ( 234 मते), गणेश बेंझोप्लास्टचे मथाई सायमन ( 219 मते), ग्लेन्फिन केमिकल्सचे अखिलेश अखिलेशस्वरन शिवरामरामकृष्णन ( 233 मते), मनोज प्लास्टिकचे दिवाकर पाटील ( 211 मते), मेकॉय फार्माचे अशोक नायर (230 मते), रॅपियर सिंथेटिकचे हरीश कुमार भगेरिया यांना 219 मते मिळून हे 11 उमेदवार आज विजयी झाले आहेत तर पराभूत उमेदवार कृष्णा देशमुख यांना 113 मते मिळाली तर देशमुख यांनी निवडणूकित उभेराहून चुरस निर्माण केली परंतु अखेरीस त्यांना पराभवास सामोरे जावे लागले
या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कॅम्लिन कोक्यूयेचे अजित राणे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निवडून आलेल्या मध्ये सर्वात जास्त 244 मते वेलजी गोगरी यांना मिळाली.
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]