पंढरपूरचा श्री विठ्ठल मंदिर परिसरात तळघर सापडले आहे. पहिल्यांदाच अशापद्धतीन तळघर सापडल्यांने सर्वच आश्चर्यचकित झाले आहे. मंदिरातील हनुमान गेटजवळ हे तळघर सापडलं आहे. त्यात एक प्राचीन मूर्ती असल्याची प्राथमिक माहिती येथे मिळते. काल रात्री 2 वाजता या गुप्त तळघराचा शोध लागला. दरम्यान, आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर आणि पुरातत्व विभागाचे पथक उपस्थित राहणार आहे. या तळघरात अंधार असल्याने स्पष्ट असे काही दिसत नाही, मात्र खोली पाच ते सहा फूट खोल आहे या खोलीत मूर्ती सदृश्य वस्तू दिसते. या तळघरात नेमकं काय आहे हे तळघर केव्हाच आहे? याविषयी जाणून घेण्यासाठी वारकऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
मंदिरासमोर पूजा करणाऱ्या बडवे व उपट या पुजारी गटाकडून माहिती घेतली आहे. मुस्लिम आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती हलविली नावाच्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. त्यामुळेच हे तळघर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 15 मार्चपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील चरणस्पर्श दर्शन बंद करण्यात आले.. तेव्हापासून मंदिराच्या विकासाचे काम सुरू झाले. हे काम पुढील 17-18 महिने सुरू राहणार आहे. मात्र गर्भगृह आणि मंदिराच्या चार खांबांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे 2 जूनपासून विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार सुरू करण्यात येणार असल्याचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी सांगितले आहे. 2 जूनपासून 9 जूनपर्यंत ज्या राहिलेल्या कुटी पुजा आहेत, त्या सर्व देवाच्या पुजा होणार आहेत. देवाची तुळशी आणि पाद्य पुजा पर्ववत सुरु होणार असल्याची माहिती औसेकर महाराजांनी दिली.
दरम्यान, तळघरात तीन ते चार दगडी मृर्त्या आढळून आले आहेत. तसेच एक पादुकाही सापडली आहे. पण या मुर्त्या नेमक्या कशाच्या आहेत? हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या ठिकाणी जे काही सापडतंय त्याची तपासणी करुन त्याचा संपूर्ण अहवाल हा राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याचंही कळतंय.