Crime News: जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
परभणी: राज्यात सध्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान बदलापूर येथील एक शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उससली आहे. त्यातच आता मराठवाड्यातील परभणीत मानवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडला आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्याना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे.
परभणीच्या मानवत येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याना आणि विद्यार्थिनी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या जनजागृती कार्यक्रमादरम्यान गुप्तपणे तक्रार केली होती. त्या संदर्भात पोलिसांकडून आणि शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत चौकशी केली असता ही बाब समोर आली. त्यानंतर मुख्याध्यापक यांच्या तक्रारीनंतर सदर शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी मानवत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सदर शिक्षकविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या शिक्षकाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सध्या शाळांमध्ये निर्भया पथकाकडून जनजागृती केली जात आहे. दरम्यान याच कार्यक्रमात काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी शिक्षकांबद्दल तक्रार असून, आम्ही त्याची तक्रार शाळेच्या तक्रार पेटीत टाकली आहे, असे सांगितले.
तक्रार पेटीत आलेल्या तक्रारीवरुन चौकशी केली असता, सदर शिक्षक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण करत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान शाळेतील शिक्षकावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या शिक्षकाचे निलंबन केले आहे. त्याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहेत.