
Parth Pawar Land Scam ajit pawar Jijai Bungalow pune come in Caught in a controversy
.पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा नोंदणीकृत पत्ता हा अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या ‘जिजाई’ बंगल्याचा देण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीचा पत्ता हा घराता पत्ता दिल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. , ‘पार्थ पवार यांनी अमेडिया कंपनीचे कार्यालय निवासी बंगल्यात सुरू केले का असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेला मिळकत कर व्यावसायिक दराने भरला आहे का? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणाची पारदर्शक पद्धतीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री असल्याचे याचा तपास पारदर्शक पद्धतीवर होईल का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. नैतिकतेच्या जोरावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे या सर्व विरोधी नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर घेतली भेट
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. दोन्ही नेत्यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर भेट झाली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीबाबत हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये या प्रकरणावरुन काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणावर अजित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तसेच या व्यवहाराबद्दल जास्त काही माहिती नाही, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर हे प्रकरण समोर आल्याने राष्ट्रवादीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.