Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

६० कोटींच्या उपसूचना घोटाळा प्रकरणी मुख्य वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची उचलबांगडी

प्रशासकीय मंजुरीचे कोणतेही ठोस निकष नसताना आणि आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध नसतानाही या ६० कोटींच्या फाईल्स नियमबाह्य पद्धतीने पुढे सरकवण्यात आल्याचे तपासात उघड झाले.

  • By अनुराधा धावडे
Updated On: May 30, 2026 | 05:00 PM
PCMC, Pimpri Chinchwad, Abhishek Barne, Pravin Jain,

PCMC, Pimpri Chinchwad, Abhishek Barne, Pravin Jain,

Follow Us
Close
Follow Us:

PCMC News : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या ६० कोटी रुपयांच्या उपसूचना घोटाळा प्रकरणात अखेर राज्य शासनाने थेट हस्तक्षेप करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखा अधिकारी सत्यवान किशनराव उबाळे यांची ‘वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने २९ मे २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले.

 

सभापती अभिषेक बारणे यांनी उघड केला घोटाळा

महानगरपालिकेच्या मूळ अंदाजपत्रकात किंवा विकासकामांच्या नियोजनात ऐनवेळी कोट्यवधी रुपयांच्या उपसूचना घुसडून, विशिष्ट कंत्राटदारांना आणि हितसंबंधियांना आर्थिक फायदा पोहोचवण्याचा डाव आखला गेला होता. हा संपूर्ण भ्रष्टाचार स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी अत्यंत आक्रमकपणे समोर आणला. स्थायी समितीचे सभापती म्हणून पदभार सांभाळत असताना, अभिषेक बारणे यांच्याकडे जेव्हा ६० कोटींच्या वाढीव निधीच्या उपसूचना मंजुरीसाठी आल्या, तेव्हा या फाईल्समधील संशयास्पद तांत्रिक आणि आर्थिक तरतुदींमुळे त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.

Supriya Sule on Pune Crime: ‘पुणे महाराष्ट्राची ‘क्राईम कॅपिटल’ होतेय’; सुप्रिया सुळेंचा गृहविभागावर हल्ला

‘अशी’ झाली कारवाई…

प्रशासकीय मंजुरीचे कोणतेही ठोस निकष नसताना आणि आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध नसतानाही या ६० कोटींच्या फाईल्स नियमबाह्य पद्धतीने पुढे सरकवण्यात आल्याचे तपासात उघड झाले. मुख्य लेखा व वित्त अधिकारी या नात्याने प्रवीण जैन यांनी या नियमबाह्य कामाला आक्षेप घेणे अपेक्षित असताना, त्यांनी कंत्राटदारांच्या फायद्यासाठी या फाईल्स मंजूर करून घेण्यामध्ये मुख्य भूमिका बजावली. सभापती अभिषेक बारणे यांनी हा भ्रष्टाचाराचा प्रकार केवळ स्थायी समितीतच रोखला नाही, तर पुराव्यांसह राज्य सरकार आणि वित्त मंत्रालयाकडे जैन यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल करून कडक कारवाईची मागणी लावून धरली होती.

 

मंत्रालयामार्फत प्राथमिक चौकशी आणि निर्णय

सभापती बारणे यांच्या तक्रारीनंतर मंत्रालयामार्फत या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यात आली. महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचा आणि शासकीय नियमांना बगल देऊन कंत्राटदारांशी संगनमत करण्याचा ठपका जैन यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या आर्थिक शिस्तीचे रक्षण करण्याऐवजी भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचे स्पष्ट झाल्यामुळे, मुख्यमंत्री आणि वित्त मंत्रालयाने जैन यांना पदावरून हटवण्याचा कठोर निर्णय घेतला.

“…तर आमचा समाज पेटून उठेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा, ओबीसी समाज रस्त्यावर

सत्यवान उबाळे यांच्याकडे धुरा

शासन आदेशानुसार, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील सहसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेत मुख्य लेखा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले  सत्यवान उबाळे यांची बदली आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखा अधिकारी’ या अत्यंत महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. या मोठ्या वादानंतर आता पिंपरी-चिंचवड पालिकेच्या आर्थिक व्यवहारांची संपूर्ण जबाबदारी उबाळे यांच्या खांद्यावर असणार आहे.

 

पर्यायी अधिकाऱ्याची वाट न पाहता तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश

शासनाने आपल्या आदेशात स्पष्ट निर्देश दिले आहेत की, बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या जागी त्वरित रुजू व्हावे. सध्याच्या नियंत्रक अधिकाऱ्यांनी बदलीस पर्यायी अधिकारी येण्याची वाट न पाहता, स्थानिक व्यवस्था करून संबंधित अधिकाऱ्यास तात्काळ कार्यमुक्त करावे, जेणेकरून प्रशासकीय कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही. स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दाखवलेली प्रशासकीय तत्परता आणि राज्य शासनाच्या या धडक कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या युतीला मोठा दणका बसल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Pcmc 60 crore supplementary budget scam 2026 finance officer pravin jain transfer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 05:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.