Photo Credit- Team Navrashtra 'छत्रपती' कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी पृथ्वीराज जाचक यांच्या पॅनेलचा विजय
बारामती: छत्रपती सहकारी साखर कारखान्याची सध्या दयनीय अवस्था झाली असल्याचे सांगत अनेक चुकीचे प्रकार घडत असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगत काही संचालकांच्या मनमानी कारभाराचे वाभाडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढून सामोपचाराची भूमिका घेत असल्याचे सांगत माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याकडे पाच वर्षांसाठी कारखान्याची सूत्रे देण्याची घोषणा जाहीर सभेत बोलताना केली.
राजकीय विचार वेगळे असले तरी सभासदांच्या प्रपंच अशी निगडित असलेला कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे माझ्या अध्यक्ष व शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांनी सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी कारखान्यातील नियमबाह्य गोष्टींवर ताशेरे ओढले.
Chhatrapati Sugar Factory Election: ‘छत्रपती’ कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर; कोण मारणार बाजी?
यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, कारखान्याचे अध्यक्ष प्रसाद काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, विश्वनाथ गावडे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, रामचंद्र निंबाळकर, अॅड. राजेंद्र काळे शिवाजीराव निंबाळकर, मुरलीधर निंबाळकर, रणजीत निंबाळकर, बाळासाहेब कोळेकर, भाऊसाहेब सपकळ, तेजसिंह पाटील, अमरसिंह कदम, सागर मिसाळ, आदींसह इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी छत्रपती कारखान्याच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा आपल्या भाषणात व्यक्त केली. पृथ्वीराज जाचक यांनी प्रास्ताविकात उपमुख्यमंत्री अजित पवार व आपले राजकीय मतभेद असले तरी कारखान्याच्या हितासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे सांगितले.
Jeetendra Bday: रिमेक चित्रपटांद्वारे बॉलिवूडमध्ये मिळवली प्रसिद्धी, वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिक्षण संस्थेची अवस्था ही वाईट असल्याचे सांगत या संस्थेच्या शाळांची इमारत नव्याने बांधण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी प्रति टनी ३०० रुपये सभासदांच्या उसातून कट करावे लागतील. मात्र यातून योग्य मार्ग काढण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. छत्रपती कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला एका कर्मचाऱ्याने लोखंडी पाईप मारण्यासाठी उभारल्याचे सांगत अशा गोष्टींवर कोणीही पांघरून न घालता संबंधित कामगाराला निलंबित करायला हवे होते, तरच भविष्यातील असे प्रकार घडणार नसल्याचे सांगत कारखान्याला शिस्त आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले